
समांतर क्रांती / खानापूर
येथील खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रखडलेल्या मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात झालेल्या आजच्या (ता.३०) सुनावणीत मतमोजणीला हिरवा कंदील मिळाला आहे. सहकार खात्याच्या निबंधकांकडून मतमोजणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
बँकेची निवडणूक १२ जानेवारी रोजी मोठ्या चुरशीने झाली होती. मात्र, दोन्ही पॅनेलनी अचानक उच्च न्यायालयात धाव घेऊन मतदार वाढवून आणले होते. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीपर्यंत मतमोजणी स्थगीत ठेवण्यात आली होती. मतपेट्या तहसिलदारांच्या अखत्यारीत आहेत. १८ दिवसांपासून दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. तसेच मतदारांची उत्सूकता शिगेली पोहचली असतांनाच आज उच्च न्यायालयाने मतमोजणीचा मार्ग खुला केला आहे.
जिल्हा सहकार निबंधकांना मतमोजणीची तारीख जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मतमोजणी घेतली जाणार असून येत्या रविवारी (ता. २) मतमोजणी शक्य आहे.
निसर्ग सेवेला ईश्वर सेवा मानणारा अवलिया एस. एस. निंगाणी
चार दशकांपासून वनसेवेत कार्यरत, जनसेवेतही रममाण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी मानवी जीवनात वृक्ष आणि निसर्गाचे स्थान-मान दर्शवितात. मानवाच्या अमर्याद गरजांसाठी निसर्गाच्या अस्तित्वावर घाला घालण्याची मानसिकता वाढलेली असताना एक अधिकारी वनसेवेलाच ईश्वरसेवा मानतो. जाईल तेथे लोकांमध्ये निसर्गा विषयी आपुलकी निर्माण करतो. अधिकारी पदाचे मोठेपण बाजूला ठेवून जंगल […]