
समांतर क्रांती / खानापूर
येथील खानापूर को-ऑप बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. ०८) १०.३० वाजता होणार आहे. निवडणूक अधिकारी व जिल्हा सहकार निबंधक रविंद्र पाटील यांनी याबाबत आज सूचना जारी केली आहे. सदर मतमोजणी बँकेच्या सभागृहात होणार आहे. मतमोजणीत कुणाचा निकाल लागणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
अचानक झालेल्या मतदारांच्या नोंदीमुळे मतदानानंतरही मतमोजणी कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने स्थगिती उठविल्यानंतर मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला होता. आता सहकार निबंधकांनी मतमोजणीचा निर्णय जाहीर केल्यामुळे आता उमेदवारांबरोबरच मतदारांना प्रचंड उत्सूकता लागून राहिले आहे.
बँक सहकार आणि बँक विकास पॅनेलमध्ये काँटे की टक्कर झाली होती. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड कुतूहल असतांना कायदेशीर बाबींमुळे मतदारांची निराशा झाली होती. आता महिन्यानंतर मतमोजणी होणार असल्याने कुणा्यचा निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
फोंड्यात 'खानापूर-बेळगावकर प्रिमियर लीग'
खानापूर: बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील गोव्यात वास्तव्यास असलेल्या बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर खानापूर-बळगावकर प्रिमियर लीग शनिवार (ता.०८) आणि रविवारी (ता.०९) कॉम्पेक्स् ग्राऊंड फोंडा येथे होणार आहे. स्पर्धेसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रथम पारितोषिक रू. २५ हजार आणि उपविजेत्या संघासह १५ हजारांचे पारितोषिक भास्कर काकोडकर यांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. अशोक सावंत […]