
समांतर क्रांती / खानापूर
येथील खानापूर को-ऑप बँकेच्या बहुचर्चीत निवडणुकीच्या आज शनिवारी (ता.०८) झालेल्या मतदानात सहकार पॅनेलने बाजी मारली. विरोधी बँक विकास पॅनेलचा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे. विरोधी बँक विकास पॅनेलमधून निवडणूक लढविलेले विद्यमान संचालक मारूती खानापुरी आणि शिवाजी पाटील यांचा दारूण पराभव झाला आहे. एकंदर, शेलारांनी बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
सविस्तर वृत्तांतासाठी वाचत रहा ‘समांतर क्रांती’…
खानापूर को-ऑप बँक: चार नवे चेहरे; तीन विद्यमान संचालकांना नारळ
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलने विरोधक बँक विकास पॅनेलचा अक्षरश: धुव्वा उडवीत वर्चस्व कायम राखले. त्यात चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली तर तीन विद्यमान संचालकांना मतदार सभासदांनी घरचा रस्ता दाखविला आहे. दरम्यान बँकेचे माजी चेअरमन कै. बाबुराव चित्रगार यांचे पुत्र राजेंद्र चित्रगार आणि माजी संचालक कै. शिवाप्पा […]