समांतर क्रांती / खानापूर
येथील अर्बन बँक म्हणून परिचीत असलेल्या खानापूर को-ऑप. बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. १२ रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यमान संचालकांतच एकवाक्यता नसल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे विद्यमान संचालक मंडळातील कांही संचालक दुसऱ्या पॅनेलमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी (ता.४) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या खानापूर को-ऑप बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात तु-तु, मै-मै सुरू आहे. यापूर्वी असे झाले नव्हते, मात्र विद्यमान संचालकांवर एकहाती वचक ठेवणारे जेष्ठ नेतृत्व नसल्याने बेदिली माजली आहे. त्याचाच फायदा उठविण्याचा प्रयत्न दुसऱ्या पॅनेलच्या माध्यमातून सुरु आहे. विद्यमान संचालक मंडळाविरोधात विद्यमान जेष्ठ संचालक शिवाजी पाटील, संचालक मारूती खानापुरी आणि माजी चेअरमन दिवंगत बाबुराव चित्रगार यांचे पूत्र राजेंद्र चित्रगार हे मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही बाजुला जाणकार असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसते.
बँकेच्या १३ जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यापैकी ७ जागा सामान्यांसाठी आरक्षित आहेत. तर सामान्य महिला, प्रत्येकी एक अ आणि ब वर्ग तसेच अनुसूचीत जाती व जमातीसाठी आरक्षित आहे. विद्यमान संचालक मंडळातून शिवाजी पाटील हे बाहेर पडून दुसरे पॅनेल उभे करण्याच्या तयारीला लागले आहेत. ते दिवंगत बाबुराव चित्रगार यांचे निकटवर्तीय म्हणून परिचीत आहेत. त्यांना संचालक मारूती खानापुरी आणि राजेंद्र चित्रगार यांची साथ लाभेल, असे चित्र आहे. विद्यमान संचालक मंडळ पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष अमृत शेलार करीत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून शनिवारी (ता.४) शेवटचा दिवस आहे. रविवारी अर्जांची छाणणी तर सोमवारपर्यंत माघार घेण्याची मुभा आहे. दरम्यान, निवडणुकीचे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्यातरी चर्चांचे धूमशान जोरात आहे.
गोव्यातील कोळवा येथे बेळगावच्या तीन महिलांना अटक
Three womens from Belgaum arrested in Kolva, Goa कोळवा: पर्यटक आणि पोलिसांशी हुज्जत घालत अर्वाच्य शिवीगाळ केल्याप्रकरणी बेळगावच्या तीन महिलांना कोळवा पोलिसांनी काल गुरूवारी (ता.०२) अटक केली आहे. जान्हवी साबळे, मधू पाटील आणि निलम पाटील अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांना कोळवा बिचवरून पोलिस स्थानकात आणल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामकाजात आढथळा […]