न्यायलयीन खटल्यातून मुक्त होण्याची संधी; न्यायालयीन शुल्कही होणार माफ
खानापूर: कौटुंबिक, स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वाद, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीसह विविध प्रकारच्या प्रलंबीत खटले निर्गत करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी येथील जेएमएफसी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ खानापूर तालुक्यातील संबंधीतांनी घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ न्यायालयाच्या न्या. झरिना यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी न्या. एस.सूर्यनारायण, न्या. विरेश हिरेमठ आणि वकिल संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी होते.
तालुक्यात अनेक खटले प्रलंबीत आहेत. यापूर्वी लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक खटल्यांवर तोडगा काढून लोकांना खटल्यातून मुक्त करण्यात आले आहे. दि. ८ जुलै रोजी अशाच प्रकारे विविध खटल्यांची निर्गत केली जाणार आहे. संबंधीतांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. ईश्वर घाडी यांनी केले आहे. लोक अदालतीत निकाली लागणाऱ्या खटल्यात पक्षकारांना न्यायालयीन शुल्क माफ केले जाणार असल्याने त्याचाही लाभ संबंधीतांना होणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड.एस.के.नंदगडी, केशव कळ्ळेकर, इर्शाद नाईक, जी.जी.पाटील, एन.वाय.कदम, आर.एन.पाटील आदी उपस्थित होते.
समांतर क्रांतीच्या बातमीचा परिणाम. पदाधिकारी धारेवर
खानापूर म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. काय घडलं बैठकीत? सविस्तर माहितीसाठी वाचा फक्त समांतर क्रांती
१६ तरूणींची बलात्कारानंतर हत्या; खानापुरच्या सुपुत्राची का होतेय चर्चा?
समांतर क्रांती विशेष खानापूर तालुक्याला पौराणिक, ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. तरीही परप्रांतात खानापूरकरांना ‘तेलगी खानापूर’चे का? अशा लाजिरवाण्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. पण, येथील अनेक सुपुत्रांनी देशभरात ही लाजिरवाणी ओळख पुसून काढण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कामगिरीतून केला आहे. सध्या गोव्यात अशाच एका संवेदनशील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. तब्बल १५ हून […]