खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोर लावण्यात आलेला नामफलक आज अधिकाऱ्यांनी हटविला. केवळ मराठीच्या आकसापोटी अधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्यामुळे समिती कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे. नगर पंचायतीची रितसर परवानगी घेतलेली असतानाही निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार फलकाचा आकार मोठा असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी हा फलक काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी नगर पंचायतीची रितसर परवानगी घेतली गेली नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यावेळी आक्षेप घेतला नव्हता पण परवानगी घेतल्यानंतरही आज पुन्हा आकार मोठा असल्याचे विचित्र कारण देत फलक काढण्यात आला. शहरात इतरही पक्षांच्या कार्यालयासमोर त्यांचे नामफलक आहेत. त्याकडे मात्र या कन्नडधार्जिण्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही.
समितीतील एकी आणि विजयाची खात्री यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची तंतरली असून त्याचाच हा परिपाक असल्याचे बोलले जात आहे. समिती कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास असमर्थता दाखविली. यावेळी कृषी सहायक संचालक दामू चव्हाण आणि हेस्कॉमच्या सहायक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर उपस्थित होत्या.
मुरलीधर पाटील म.ए. समितीचे उमेदवार
मुरलीधर पाटील म.ए. समितीचे उमेदवारखानापूर: तालुका म.ए. समितीने भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी ही घोषणा केली.समितीकडे पाच इच्छुकांनी अर्ज दिले होते. शुक्रवारी (ता.०७) या पाचही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान,मतदानाद्वारे उमेदवार निवडीचा निर्णय घेण्यात आला. […]