समांतर क्रांती / खानापूर
नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांची प्रतिक्षा संपली असली तरी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. पुन्हा इच्छूकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. Khanapur Nagar Panchayat President-Vice President Election
नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही जागांसाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे २६ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीला नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी हरकत घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २१ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने अनिश्चित कालावधीसाठी निवडणुकीला स्थगिती दिली होती.
दोन्ही जागांवर सामान्य महिला आरक्षण जाहीर करून अन्याय करण्यात आला असल्याचा दावा श्री. मादार यांनी केला होता. सध्या ही स्थगिती उठविण्यात आली आहे. सरकारने निवणुकीची प्रक्रिया विनाविलंब पार पाडावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुन्हा एकदा नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. १४ नगरसेवकांच्या गटाने त्यासाठी आपल्या गोटातील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रयत्न चालविले आहेत.
दरम्यान, या स्थगिती आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी जाहीर केले आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून शांत असलेले राजकारण पेटत असतांनाच त्यावर पाणी पडले आहे. नगराध्यक्ष नसल्याने नगर पंचायतीतील कारभार बेदरकार बनला असल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निवडणूक व्हावी, अशी शहरवासीयांची आपेक्षा आहे.
मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राजेंद्र केरकर
समांतर क्रांती / साखळी दुसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी साहित्यिक राजेंद्र केरकर यांनी निवड करण्यात आली आहे. साखळी (गोवा) येथे १९ जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होणार असून स्वागताध्यक्ष ॲड. यशवंत गावस असतील. गोमंतक मराठी अकादमी आणि मराठी असे आमची मायबोली या संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीतील […]