समांतर क्रांती / खानापूर
गुन्हे प्रतिबंध मासानिमित्त बुधवारपासून (ता.11) खानापूर शहरात पोलीस खात्याच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे.
अलीकडे शहर आणि ग्रामीण भागातदेखील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. घरफोड्या, महिलांच्या दागिन्यांची चोरी, बसमध्ये लुबाडणूक असे प्रकार वाढत असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी व्यक्त केले.
कुणीही अडचणीत असल्यास तात्काळ मदतीसाठी पोलीस तत्पर आहेत. नागरिकांनी 112 या क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन उपनिरीक्षक एम. बी. बिरादार यांनी केले.
यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक चन्नबसव बबली यांच्यासह कर्मचारी जगदीश काद्रोळी, बी. जी. एलीगार, शेषप्पा खामेकारी आदी उपस्थित होते.
तिओलीत बेरोजगार तरुणाची आत्महत्या
समांतर क्रांती /खानापूर वर्षभरापासून बेरोजगार असलेल्या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील तिओली येथे आज बुधवारी (ता.11) उघडकीस आली. प्रकाश कारू मिनोज (वय 32) असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रकाश हा गेल्या वर्षभरापासून बेरोजगार होता. नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला होता. त्याचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे शिवारात कामाला गेले असता, एकटाच […]