
पुणे: पुणेस्थित बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आज मंगळवारपासून (ता.२८) ‘खानापूर प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. धायरी पुणे येथे होत असलेल्या या स्पर्धेसाठी ३१ हजार, २६ हजार, २१ हजार आणि १५ हजार अशी पारितोषीके आहेत. संतोष वीर, मारूती वाणी, नारायण गावडे, आकाश पासलकर यांनी या स्पर्धेसाठी पारितोषीके पुरस्कृत केली आहेत.
आज या स्पर्धेचे उद्घाटन समारंभात वास्तुविशारद पिटर डिसोझा, सिस्टिम इंजिनिअरींगचे परशुराम वीर, उद्योजक लक्ष्मण काकतकर, अनिकेत इंडस्ट्रिजचे संचालक नारायण गावडे, उद्योजक बालाजी कुंभार, दत्ता पडवळकर, हिंदुस्थान लेजरचे सुरेश हालगी, उद्योजक आकाश पासलकर, खानापूर मित्र मंडळाचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी दिप प्रज्वलन केले. उद्घाटन विजय पाटील, मारूती वाणी, अनिलभाऊ भुमकर, संतोष वीर, सतिश शास्त्री यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेचे आयोजन खानापूर प्रिमियर लिगने केले आहे. लिगचे अध्यक्ष रामू गुंडप, उपाध्यक्ष विनायक गुरव, खजिनदार रामदास घाडी, सचिव सचिन पाटील आदींसह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. ही स्पर्धा पुढील दोन दिवस चालणार असून त्याचे थेट प्रक्षेपण युट्यूबवरून केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष रामू गुंडप यांनी दिली.
गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्याच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवर गतीरोधक आहेत. पण, हे गतीरोधक अवैधानिक असल्याने ते जिवघेणे बनले आहेत. अशाच एका गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सावित्री प्रभाकर पाटील (कडबगट्टी, ता. आळणावर) असे या महिलेचे नाव असून १९ जानेवारी रोजी नातेवाईकाच्या अत्यंविधी आटोपून पतीसमवेत […]