समांतर क्रांती न्यूज
खानापूर: रामनगर रस्त्याच्या दुर्दशेचे कवित्व सात वर्षानंतरही संपेनासे झाल्याने अव्वाच्या सव्वा बाता मारणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाक कापले गेले तरी भोके अजून शिल्लक असल्याचा अनुभव या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना येत आहे. उन्हाळ्यात धूळीने माखणाऱ्या प्रवाशांना पावसाळा सुरू झाल्यानंतर चिखलातून वाट काढावी लागत आहे. अपघातामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी तरी वाहतूक सुरळीत होईल असे काम करण्याची सूचना केली होती. पण, अधिकाऱ्यांनीही राजकीय नेत्यांसारखीच आश्वासनबाजी चालविल्याचे दिसून येत आहे. For the last seven years, the work of the national highway from Khanapur-Ramnagar and further from Ramnagar to Anmod and the Karnataka border has been stalled.
गेल्या सात वर्षांपासून खानापूर-रामनगर आणि पुढील रामनगर ते अनमोड आणि कर्नाटक हद्दीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. बेफाम वृक्षतोडीमुळे या कामाविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचा हा परिणाम आहे. कामाला सुरूवात करण्यास हिरवा कंदिल मिळाला तरी कंत्राटदाराचा कामचुकारपणा आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष याचा परिपाक म्हणून यंदाही उन्हाळ्यात धुळीचा सामना केलेल्या प्रवाशांना आता चिखलाला दोन हात करावे लागत आहेत. अद्याप दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. तरीही आतापासूनच वाहने रस्त्याच्या बाजुने अडकून पडण्याच्या घटना घडत आहेत. केवळ एकाच बाजुचा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे दोन वाहने कशीबशी जातात. त्यात बाजुने टाकण्यात आलेल्या मातीचा चिखल झाल्यामुळे त्यात वाहने अडकून प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
अवजड वाहने अडकून पडत आहेत. यापूर्वी वाहने पलटी झाल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. दुचाकीस्वाराना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकार जणू मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.
बाजूपट्ट्यांवर मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहने अडकून पडत आहेत. अनेक ठिकाणे अपघातप्रवण बनली आहेत. महामार्ग प्राधिकारणाला मोठ्या अपघाताची प्रतिक्षा आहे का असा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील राजकर्त्यांनादेखील या समस्येबाबत आस्था नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी या भागातील जनतेनेच आता आंदोलनास्त्र उगारावे लागेल.
- उदय कापोलकर, सावरगाळी
केंद्र सरकारकडून देशातील रस्ते विकासाचे गोडवे गायले जात आहेत. भाजप सरकारने रस्त्यांचे जाळे विणल्याने विकासाला दिशा मिळाल्याचे त्यांचे कार्यकर्ते कोकलून सांगत आहेत. पण, त्याच सरकारला एका रामनगर रस्त्याची समस्या सोडविता येत नसल्याने त्यांचे अपयश उघड्यावर पडले आहे. जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगून संबंधीतांनी रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- शंकर गावडा, माणिकवाडी
कुणी चिल्लर देता का चिल्लर!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: महिलांसाठी बसचा प्रवास मोफत करण्यात आल्यानंतर आता कर्नाटक राज्य परिवहन मंडळाला भलत्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. चिल्लर मिळत नसल्याने वाहक (कंडक्टर) वैतागले आहेत. त्यांना चिल्लरसाठी बससेवा सोडून चिल्लरसाठी हॉटेल आणि दुकाने फिरावी लागत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, आम्ही तरी काय करू, असे ते म्हणतात. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी […]