
वाहन नादुरूस्त ल्याने कचरा विखुरण्याचा प्रकार उघडकीस
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर – लोंढा महामार्गावर कचरा विखरून पडण्याच्या घटनांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. सदर कचरा गोव्याहून बेळगावच्या दिशेने जात असल्याचे उघडकीस आले आहे. होनकलजवळ एक कचरावाहू ट्रक नादुरूस्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, प्रशासन मात्र अजुनही या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसते.
गेल्या महिनाभरापासून अज्ञात वाहनातून कचरा महाार्गावर पडत असल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. कचऱ्यामुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनला असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. हा कचरा कुठून येतो आणि कुठे जातो? याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, होनकलजवळ एक ट्रक नादुरूस्त होऊन त्यातील कचरा रस्त्यावर पडल्याने कचऱ्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचा शोध लागला आहे.
नादुरूस्त वाहन महामार्गाच्या कडेला थांबविण्यात आले असून त्यातून कचरा रस्त्यावर विखुरला आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एरवी, वाहन चालकांना नाहक त्रास देणाऱ्या पोलिसांनी सुध्दा या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील काळातही ही जिवघेणी कचरा वाहतूक सुरूच राहणार आहे. वाहन चालकांकडून माहिती घेऊन संबंधीतावर कारवाईची मागणी होत आहे.
कचरा बेळगावकडे वाहतूक केला जात असून तो गोव्यातून येत असल्याचे समजते. कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी तो इकडे आणला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रशासनाने शहानिशा करावी, अशी मागणीदेखील जोर धरत आहे.
खानापूर को-ऑप बँकेवर ‘शेलारां’चेच वर्चस्व
समांतर क्रांती / खानापूर येथील खानापूर को-ऑप बँकेच्या बहुचर्चीत निवडणुकीच्या आज शनिवारी (ता.०८) झालेल्या मतदानात सहकार पॅनेलने बाजी मारली. विरोधी बँक विकास पॅनेलचा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे. विरोधी बँक विकास पॅनेलमधून निवडणूक लढविलेले विद्यमान संचालक मारूती खानापुरी आणि शिवाजी पाटील यांचा दारूण पराभव झाला आहे. एकंदर, शेलारांनी बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. […]