समांतर क्रांती / खानापूर
तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांनी गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्या घैरव्यवहाराच्या चित्तरकथा आता चवीने चघळल्या जात आहेत. ते जेथे जातील तेथे केवळ गैरमार्गाने मालमत्ता जमवीत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टीसह अनेक ठिकाणी त्यांनी शेतजमिन खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय त्यांनी बैलहोंगल, हल्याळ आणि निपाणीत शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. बेळगावात कुबेर नावाने अलिशान बंगला उभारला आहे. तर मुलाच्या नावाने कमर्शियल अपार्टमेंटदेखील आहे. शिवाय त्यांच्याकडे सुमारे ५७ लाखांच्या अलिशान कारदेखील मिळाल्या आहेत. एखाद्या उद्योजकाला लाजविल असे त्यांचे अलिशान राहनीमान होते.
लोकायुक्तांनी छापा मारल्यानंतर गायकवाड यांची अनेक कृष्णकृत्ये बाहेर पडली आहेत. त्यात खानापूर तालुक्यासह निपाणी येथील कांहीजण अडकण्याची शक्यता आहे.
सत्काराच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई..लोकप्रतिनिधी तोंडघशी
सोमवारी (ता.६) प्रकाश गायकवाड यांनी तालुक्यात ‘प्रामाणिक’ सेवा बजावल्याबद्दल येथील आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गायकवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात आडकल्याने हात दाखवून अवलक्षण अशी आमदारांची आवस्था झाली आहे. त्या सत्काराचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता टीकेचा भाडीमार होत आहे.
गायकवाड यांच्या कृष्णकृत्यांची माहिती असतांनाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आमदार करीत होते का? असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे. गायकवाड यांच्या कार्यप्रणालीला तालुक्यातील जनता वैतागली होती. त्यांच्या काळ्याकारनाम्यांची चर्चा होत असतांनाही त्यांचा जंगी सन्मान करून आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नेमका कोणता संदेश तालुक्यातील जनतेला द्यायचा होता? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
सत्काराचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘हेच तालुक्याचं दुदैव’असल्याची टीका केली आहे. तर कांहीनी आमदार त्यांना पाठीशी घालत होते का? असा थेट सवाल केला आहे. एकंदर, तालुक्यातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि आमदारांसह भाजपने त्याकडे केलेले दुर्लक्ष हा सगळा प्रकार संशयास्पद आहे.
खानापूरच्या महसूल खात्यात आणखी एक धमाका; तीन जण निलंबीत
समांतर क्रांती / खानापूर तहसिलच्या अखत्यारीत येणाऱ्या भूमापन विभागातील उपसंचालकांसह अन्य दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात आज गुरूवारी (०९) बाबत आदेश बजावण्यात आला आहे. कालच बुधवारी येथील तहसिलदारांवर लोकायुक्तांनी धाड टाकली होती, त्यानंतर झालेल्या या कारवाईने तालुक्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील हुळंद येथील जमिनीतील फेरफार प्रकरण संबंधीतांना शेकले आहे. अखिल भारतीय […]