समांतर क्रांती / खानापूर
येथील मिनिविधानसौध म्हणजे तहसिल कार्यालय आवार हा समस्यांचे आगार आणि वाहनतळ बनले आहे. विशेष म्हणजे येथे वाहने लावू नयेत, असा फलक असलेल्या ठिकाणीच कर्मचारी आणि अधिकारी त्यांची वाहने थांबवितात. यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ‘सामाजिक’ अशिक्षितपणाच उघडा पडत आहे.
मिनीविधानसौधच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजुला ‘नो पार्किंग’ या इंग्रजी फलकासह अन्य एक फलक लावण्यात आला आहे. त्यावर ‘या ठिकाणी वाहने लावल्यास सदर वाहने पोलिसांकडे सोपविली जातील’ असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, संपूर्ण आवार मोकळे असले तरी जाणिवपूर्वक तेथेच वाहने थांबवून जणू फलक लावणाऱ्या तहशिलदारांनाच आव्हान दिले जात आहे.
दिव्यांगाना कार्यालयात जाण्यासाठी तेथून रस्ता आहे. वाहने थांबविली जात असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. येता-जाता ही बाब तहशिलदारांच्या नजरेस येत असतांनाही समभमधीत वाहनधारकांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांची भीड चेपली आहे. तालुक्याचा डोलारा सांभाळणाऱ्या तहशिलदार कार्यालयाची अशी दूरवस्था आहे. तालुका दंडाधिकारी कार्यालयातच कायद्याचे असे उल्लंघन होत असल्याने तालुक्याच्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तहशिलदार प्रकाश गायकवाड याची दखल घेत संबंधीतांवर कारवाई करतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठा मंडळ ‘ताराराणी’च्या विद्यार्थीनींचा सत्कार
समांतर क्रांती / खानापूर मराठा मंडळ संचलीत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. येथील विद्यार्थिनींनी अनेक आव्हानात्मक संकटाचा सामना करीत, आपल्या ज्ञानाचे व शारिरीक क्षमतेचा कस लावत भारतीय सैन्यात मानाचे स्थान मिळविले आहे. हे यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत व सराव यांची सांगड घालत कुमारी स्वाती पाटील, कुमारी पूनम […]