
समांतर क्रांती / खानापूर
येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सोमवार दि. २७ रोजी त्यासाठी निवडणूक होणार आहे. तब्बल सहा महिन्यांनी शहराला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मिळणार आहे.
मागील वर्षी २६ ऑगस्टला ही निवडणूक होणार होती. पण, दोन्ही जागा सामान्य महिलेसाठी राखीव ठेवण्यात आल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. १५ डिसेंबर रोजी ही स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली होती. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. आता ही निवडणूक दि. २७ रोजी होणार असून पुन्हा एकदा नगर पंचायतीचे राजकारण तापणार आहे.
सोमवार दि. २७ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत अर्ज दाखल केले जातील. दुपारी २ वाजता अर्जांची छाणणी होईल तर आवश्यकता भासल्यास ३ वाजता मतदान होणार आहे. नव्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. नगर पंचायतीत २० पैकी ९ नगरसेविका आहेत. नगरसेवकांत दोन गट असून १४ व ६ असे बलाबल आहे. प्रत्येकी गटातून दोन-दोन नगरसेविका इच्छूक आहेत. त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित आहे. पण, ऐनवेळी चित्र पालटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांअभावी नगर पंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’ चालला होता. कोणतेच काम होत नसल्याने शहरवासीय वैतागले होते. आता सहा महिन्यानंतर पंचायतीला कारभारी मिळणार असल्याने कारभार सुरळीत होईल, ही आपेक्षा आहे.

आमदार साहेब, निधीच नाही; कामं कशी करायची?
समांतर क्रांती / खानापूर नंदगड येथील महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काल शुक्रवारी तिसऱ्यांदा बैठक घेतली. केवळ अधिकाऱ्यांना सूचना करण्यापलिकडे त्यांनी समस्यांवर कांहीच ठोस उपाय न योजल्याने नंदगडवासीयांची घोर निराशा झाली आहे. बैठकीत माना डोलावून आमदारांच्या होला हो म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी निधीच नाही, तर कामं कशी करणार? असा सूर आळवण्यास सुरूवात केली आहे. परिणामी, […]