खानापूर: येथील नगर पंचायत नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. कार्यालयाच्या समोरच शाहूनगर ही डोंबारी वसाहत आहे. तेथील अनियमित पाणी पुरावठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, मात्र त्याची चिंता कुणालाच नाही. नगर पंचायत कार्यालयासमोरील जलकुंभाला कधीच पाणी येत नाही, अशी या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.
नगर पंचायत कार्यालयाच्या समोर काही वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. शाहूनगरमधील लोकांची सोय व्हावी यासाठी ही टाकी बसविली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून ती टाकी निरर्थक बनली आहे. सकाळी केव्हातरी तीत पाणी सोडले जाते. ते काही वेळात संपून जाते. त्यामुळे लोकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नगरातील इतर जलकुंभांचीही हीच अवस्था आहे. शिवाय हे जलकुंभ कधीच स्वच्छ केले जात नसल्याने नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात.
एकंदर, नगर पंचायतीचा कारभार दिव्याखाली अंधार असाच आहे. त्याबद्दल संताप व्यक्त होत असून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो सौजन्य: प्रसादसिंह दळवी, खानापूर
मराठीची पोटशूळ;कार्यालयासमोरील फलक हटविला
खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोर लावण्यात आलेला नामफलक आज अधिकाऱ्यांनी हटविला. केवळ मराठीच्या आकसापोटी अधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्यामुळे समिती कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे. नगर पंचायतीची रितसर परवानगी घेतलेली असतानाही निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार फलकाचा आकार मोठा असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी हा फलक काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी नगर पंचायतीची रितसर […]