समांतर क्रांती वृत्त
खानापूर: ‘खुर्ची’साठी धडपडणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकावासीयांचे मनोरंजन चालविले आहे. येथील क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांच्या जागी बेळगावचे वाय.के.बजंत्री यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. १ जूनला आदेश देण्यात आल्यानंतर सोमवारी (ता.०३) ते तात्काळ रुजू झाले. पण, याच काळात श्रीमती कुडची यांनी कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. त्यामुळे त्यांनीही येथील ताबा सोडला नाही. बुधवारी दोन्ही अधिकारी एकाचवेळी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राचा ‘उध्दार’ करण्याच्या कामी लागल्याने कर्मचाऱ्यांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. यात तालुकावासीयांचे मात्र केवळ मनोरंजनच झाले. दरम्यान, श्रीमती कुडची यांनी स्थगीती आदेश मिळविला असून त्यावर १२ रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच खानापूरचे बीईओ कोण असतील, हे निश्चित होणार आहे. तर्तास, श्रीमती कुडची यांच्याकडेच पदभार आहे. श्री. बजंत्री यांनी घाईगडबडीत बेळगावमधील पदभार सोडला असून त्यांची ही घाई महागात पडेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
खानापूरपासून आवघ्या ४ कि.मी. अंतरावर आहे हा धबधबा..
समांतर क्रांती विशेष अर्धा डझन नद्या आणि डझनभर नाल्यांचा उगम असणाऱ्या खानापूर तालुक्यातील धबधबेही तेवढेच विलोभनीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. खानापूर शहरापासून आवघ्या चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाचोळी धबधब्यालाही आता पर्यटक हमखास भेटत देत आहेत. कुंभार नाल्यावर असणाऱ्या कर्नाटक जलसंधारण खात्याच्या तलावातून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. खानापूर येथे मलप्रभा नदीला मिळणाऱ्या […]