समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुक्यातील कांही ग्राम पंचायतींची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आरक्षणामुळे कांही निवडी अविरोध झाल्या तर कांही ठिकाणी चुरशीची लढत पहावयास मिळाली. जांबोटी ग्रा. पं.च्या उपाध्यक्षपद निवडीत धक्कादायक निकाल लागला. वडगावचे सुनिल शंकर देसाई यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अनपेक्षीत साथ देत सर्वानाच धक्का दिला. चापगाव ग्रा.पं.ची निवडणूक अटीतटीची झाली. यात म.ए.समितीला निर्विवाद वर्चस्व स्थापण्याची संधी मिळाली.
हेब्बाळ ग्राम पंचायत
हेब्बाळ ग्रामपंचायतींची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भाजपा नेते माजी आमदार अरविंद पाटील, तसेच जि.पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी यांच्या प्रयत्नाने निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. या निवडणुकीत अध्यक्षपदी शीतल मष्णु मडवाळ तर उपाध्यक्षपदी वैष्णवी विष्णू काद्रोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जांबोटी ग्राम पंचायत
या ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी मारूती तळवार यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी सुर्यकांत साबळे आणि सुनिल देसाई यांनी अर्ज दाखल केले होते. पण ऐनवेळी श्री साबळे यांच्या समर्थकांनी त्यांना हात दिल्याने सुनिल देसाई यांची उपाध्यक्षपदी ११ पैकी ७ मतांनी निवड झाली. ते दुसऱ्यांदा सदस्य झाले होते. यावेळी त्यांना उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली असून पंचायत अखत्यारीत गावांच्या विकासात योगदान देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
https://www.samantarkranti.in/40-villages-in-khanapur-taluka-are-island-like/
करंबळ ग्राम पंचायत
करंबळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महेश रुक्कमान्ना गुरव (जळगे) यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ. सुनंदा मल्लाप्पा इरगार (रुमेवाडी) यांची निवड झाली आहे. ते भाजपचा नेता पंडीत ओगले यांचे समर्थक आहेत. निवडीनंतर ओगले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले.
चापगाव ग्राम पंचायत
चापगाव ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ५ विरुध्द ४ असे मतदान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत गंगव्वा सिध्दप्पा कुरबर (वड्डेबैल) यांनी नजिर सनदी यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत मालूबाई अशोक पाटील यांनी लक्ष्मी हणमंत मादार यांचा पराभव केला. पशू वैद्याधिकारी डॉ. उमेश होसूर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रा.पं.सदस्य नागराज यळ्ळूकर, सूर्याजी पाटील, देमव्वा मादार, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, माजी उपाध्यक्ष मारूती चोपडे आणि समिती नेते रमेश धबाले यांच्यासह पंचायत अखत्यारीतील नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. निवडीनंतर विकास अधिकारी आरती अंगडी यांनी उभयत्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. नुत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या समर्थकांनी यावेळी जल्लोष साजरा केला. पंचायतीवर म.ए.समितीचे वर्चस्व प्रस्तापित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Hi there,
We run an Instagram growth service, which increases your number of followers both safely and practically.
– Guaranteed: We guarantee to gain you 300-1000+ followers per month.
– Real, human followers: People follow you because they are interested in your business or niche.
– Safe: All actions are made manually. We do not use any bots.
The price is just $60 (USD) per month, and we can start immediately.
If you are interested, and have any questions, reply back and we can discuss further.
Kind Regards,
Libby