खानापूर म.ए.समिती अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाईच
खानापूर: येथील समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाई, कार्याध्यक्षपदी मुरलीधर पाटील, निरंजन देसाई, सरचटनिस आबासाहेब दळवी, सहचिटनिस रणजित पाटील, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत तर उपाध्यक्ष म्हणून जयराम देसाई, कृष्णा कुंभार, मारुती गुरव, रमेश धबाले आणि कृष्णा मंनोळकर यांची निवड करण्यात आल्याचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी जाहीर केले.
म.ए.समितीच्या पदाधिकारी निवडीबद्दल पुन्हा गैरसमज होण्याची शक्यता! कोण-काय म्हणाले?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सोमवारी ‘बंद दाराआड’ करण्यात आल्यानंतर युवा नेते आणि कार्याध्यक्ष निरंजन देसाई यांनीच समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी समाज माध्यमातून याबाबत वाच्यता केली असून पुन्हा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वर्तविल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल चर्चेला सुरूवात झाली आहे. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनीही ‘पदाधिकारी निवडीची घाई का?’ असा […]