तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण हे म.ए.समितीचे बालेकिल्ले. मात्र तेदेखील यावेळी ढासळले. जांबोटी भागातील कणकुंबी, पारवाड, कालमणी, बैलूर, तोराळी या गावांमध्ये समितीला आपेक्षित मतदान झालेले नाही. समितीला पर्याय म्हणून मतदार भाजपला मतदान करतील, अशी जेथे आपेक्षा होती. त्याठिकाणी काँग्रेस आणि निजदने बाजी मारली आहे. लोंढा भागात खानापूर ते वाटरेपर्यंतची स्थिती समितीसाठी समाधानकारक असली तरी पुढील गावांमध्ये समितीला आपेक्षित मतदान झालेले नाही. नंदगड, हलशीत काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तर हालगा आणि परिसरातील गावांमधून समितीला समाधानकारक मतदान झाले.
मराठीबहुल गर्लगुंजीत यावेळीही काँग्रेसचा वरचश्मा पाहावयास मिळाला. तर इदलहोंड, गणेबैल, अंकले या गावांमध्ये समितीचे मुसंडी मारली आहे. निट्टूरमध्ये मात्र भाजपचेच वर्चस्व कायम राहिले आहे. नागरगाळी, गोदगेरी आणि गोधोळी परिसरात भाजप आणि काँग्रेसला मतदारांनी पसंती दिली आहे. त्याव्यतिरिक्त बेकवाड परिसरातील गावांतून समितीला बऱ्यापैकी मतदान झाले आहे. या गावांमध्ये काँग्रेसलासुध्दा समाधानकारक मतदान झाल्याची शक्यता आहे. खानापूर शहराने मात्र समिती, काँग्रेस आणि निजदच्या उमेदवाराला हात दिला असून भाजपला सर्वाधिक मतदान झाल्याचे मानले जात आहे. शहराच्या जवळपासच्या गावातील स्थितीही जवळपास अशीच आहे.
पूर्व भागात यावेळी नासीर बागवान यांनी चांगलीच मुसंडी मारली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजप असू शकते. काँग्रेसच्या हाताला केवळ अनुसुचीत जाती-जमातीची मते लागली आहेत. एकंदर, कांचनम् सिध्दीने तालुक्यातील राजकारणाची गणिते बदलली असून विजयाची समिकरणे चुकण्याची शक्यता आहे. तिन्ही उमेदवारांनी पैशांचा पाऊस पाडला हे ओपन सिक्रेट आहे. त्यात त्यांचेही पैसे घ्या पण मतदान आम्हाला करा, असा अनावश्यक प्रचार केला गेल्याने त्याचे उलट परिणामदेखील शक्य आहेत. तिन्ही उमेदवारांनी कांचनम् सिध्दी पॉलिसी राबविल्यामुळे त्यांच्या समसमान मत विभागणीची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास समितीचे मुरलीधर पाटील यांचा विजय निश्चित आहे. कारण, समितीचा एकच उमेदवार रिंगणात होता, त्याशिवाय बेळगावमधील वातावरणाचाही येथील निवडणूक प्रचारावर प्रभाव होता. परिणामी, मराठी मतदारांनी यावेळी समितीला मतदान करून पक्षीय राजकारणाला राम-राम ठोकल्याचा अंदाज आहे. महिलांच्या मतांवर विजयी होऊ हा ट्रेड कितपत काम करू शकतो, हे सांगणे मात्र घाईचे ठरेल. महिलांची मते डॉ. अंजली निंबाळकर यांनाच मिळाली असण्याबाबत शासंकता आहे. कारण, विरोधी उमेदवारांनीही महिलांवर भेटवस्तूंची खैरात केली होती.
मतदानाचा निकाल आवघ्या दोन दिवसांवर असल्याने सर्वच उमेदवार आणि त्यांचे समर्थक ठोकताळे बांधत आहेत. पण, मतदारांच्या मनात काय होते, याचा उलगडा इव्हीएम मशीनमधून दि. १३ रोजी होणार आहे. तोपर्यंत वेट अँड वाच..
किती जागांवर फडकणार समितीचा भगवा?
अंदाज अपना अपना.. समितीचा प्रचारातील धडाका पाहता यावेळी बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकणार हे निश्चित आहे. तर बेळगाव उत्तर, खानापूर आणि यमकनमर्डी मतदारसंघात समितीला पराभव सहन करावा लागू शकतो.बेळगाव: मतमोजणीचा काऊंट डाऊन आता काही वेळातच सुरू होणार असून बेळगाव आणि खानापुरातून समितीचा भगवा किती जागांवर फडकणार? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकात […]