समांतर क्रांती वृत्त
खानापूर: महिलांसाठी बसचा प्रवास मोफत करण्यात आल्यानंतर आता कर्नाटक राज्य परिवहन मंडळाला भलत्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. चिल्लर मिळत नसल्याने वाहक (कंडक्टर) वैतागले आहेत. त्यांना चिल्लरसाठी बससेवा सोडून चिल्लरसाठी हॉटेल आणि दुकाने फिरावी लागत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, आम्ही तरी काय करू, असे ते म्हणतात.
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी केवळ पुरूषांचे तिकीट कापले जाते. प्रत्येकजन शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटा वाहकांच्या हातात टेकवत आहेत. परिणामी, ही वाहकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. महिला प्रवाशी पूर्वी जेवढे तिकीट तेवढे सुटे पैशे देत असत त्यामुळे चिल्लरचा म्हणावा तुटवडा भासत नव्हता. पण, आता महिलांसाठी बसचा प्रवास मोफत असल्याने चिल्लरची समस्या निर्माण झाली आहे. खानापूर-बेळगाव मार्गावर धावणाऱ्या बसच्या वाहकांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
प्रत्येक फेरीला बस स्थानकात आल्यानंतर वाहकाला स्थानकाशेजारील हॉटेल, पान टपऱ्या आणि दुकानांमध्ये जाऊन चिल्लर देता का चिल्लर अशी विनवणी करावी लागत असल्याचे वाहकांकडून सांगितले जात आहे. एकंदर, मोफत बसप्रवासामुळे महिलांचा प्रवास सूकर झाला असला तरी परिवहन मंडळाची डोकेदुखी वाढली आहे.
गावठाण घोटाळा: देवाचीहट्टीतून अधिकाऱ्यांचे पलायन
समांतर क्रांती वृत्त जांबोटी: गावठाण जमिनीत अतिक्रमण केल्याच्या तक्रारीनंतर पाहणीसाठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे न ऐकताच पलायन केल्याची घटना घडल्याने देवाचीहट्टी येथील नागरीकांतून संताप व्यक्य होत आहे. गावातील लोकांनी आपणाला जमिन हवी, यासाठी हुज्जत घालत गोंधळ माजविल्याने तेथे थांबण्यात अर्थ नव्हता, असे चौकशी अधिकाऱ्यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले. देवाचीहट्टी येथील गावठाण जमिन कांही मोजक्याच […]