समांतर क्रांती / खानापूर
येथील महालक्ष्मी ग्रूपच्या लैला शुगर्सच्या गाळप हंगामाला नुकताच सुरूवात झाली आहे. यंदा गाळपाला महिनाभर उशिर झाल्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात होती. तसेच विरोधकांकडून आरोप केले जात असतांना गाळपाला सुरूवात झाली आहे. लैलाचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गव्हाणीत ऊस टाकून गाळपाचा शुभारभ केला.
कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दररोज चाडेचार हजार टन गाळप होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही उद्दीष्टपूर्ती होईल. स्थानिक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आतापर्यंत व्यवस्थापनाने पारदर्शक व्यवहार ठेवला आहे. वेळेत ऊसबिल अदा करून कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून यंदाही समाधानकारक दर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्रासह स्थानिक टोळ्या आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी दिली. संचालक बाळगौडा पाटील, पुंडलिक गुरव, परशराम तोराळकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
सखाराम गावकर यांना ॲड.घाडींकडून मदतीचा हात
समांतर क्रांती / खानापूर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले सखाराम महादेव गावकर यांचा पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी निधी देण्यास वनखात्याने चालढकल चालविली आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याची माहिती मिळताच ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी सखाराम यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना रु. ५००० ची आर्थिक मदत केली. तसेच त्याना […]