समांतर क्रांती / खानापूर
लैला शुगर्सने यंदा ऊसाला प्रतिटन ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. तसेच मागील गळीर हंगामातील थकीत ५० रुपये प्रतिटन हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती लैला शुगर्सचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली.
लैला शुगर्सने यंदा दोन बॉयलर बसवून दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने ऊस गाळपाला एक महिना उशिर झाला. तरीही सध्या ऊस गाळप जोमाने सुरू आहे. प्रतिटन ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर केला असून १५ दिवसांपासून ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना बिल अदा करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार हलगेकर यांनी दिली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधीक ऊस पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
विविध कारणांनी ऊस मळ्यांना आग लागलेली असल्यास संबंधीत शेतकऱ्याच्या ऊसाची विनाविलंब सोय करण्यात येते. त्याशिवाय ऊसाच्या वजनात पारर्दशकता आहे, असेही ते यावेळी म्हणाले. प्रसंगी पत्रकार परिषदेला व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, महालक्ष्मी सोसायटीचे सरव्यवस्थापक तुकाराम हुंदरे, संचालक चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर, विठ्ठल करंबळकर, व्यवस्थापक गुंडू पाखरे आदी उपस्थित होते.
जांबोटी पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा बुधवारी रौप्य महोत्सव
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील पहिली पतसंस्था जांबोटी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव कृष्णाजी बेळगांवकर (संस्थापक अध्यक्ष) राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिपप्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमदार विठ्ठल सो. हलगेकर, श्री पिसेदेव […]