
कारवार: उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या शिरसीतील घरात सोमवारी (ता.१३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्यांने एन्ट्री मारली. कांही काळ बिबट्यांने आहाराचा शोध घेतल्यानंतर तेथून पळ काढला. खासदार कागेरी हे यावेळी घरात होते.
रात्री घराच्या परिसरातील बागेतून बिबट्या घराच्या अंगणात आला. त्यांने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे कांही वेळाने तो तेथून अंधारात नाहीसा झाला. यात कुत्रा बालंबाल बचावला. ही घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनाधिकाऱ्यांनी खासदार हेगडेंच्या घरी भेट देऊन बिबट्याच्या वावराची माहिती घेतली आहे.

सीमाप्रश्नी पंतप्रधानांकडे बाजू मांडा; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना साकडे
बेळगाव : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची खानापूर म.ए.समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी गोवा येथे भेट घेतली. यावेळी दळवी यांनी, फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी […]