मुंबई: विवेकवादी विचारवंत आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. शार्पशुटर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. दाभोळकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही या प्रकरणात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजी पुनाळकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे.
खानापुरात पाऊस, मात्र उष्णता कायम
खानापूर: शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा उष्णता वाढली. दुसऱ्यांदा आज शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी पावसाने हात दिला होता. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सर्वच नदी-नाल्यात ठणठणाट आहे. अंतरजल पातळीतदेखील कमालाची घट […]