समांतर क्रांती / अनमोड
गोव्यातून दारूची तस्करी करणाऱ्या कँटर चालकास अनमोड येथील अबकारी अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची ७४ लिटर गोवा बनावटीच्या दारूसह एकुण १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मुकेश सिंग वास या चालकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो दारूची तस्करी करीत होता. आज गुरूवारी (ता.१९) वाहन तपासणी दरम्यान गोवा बनावटीची दारू आढळून आली. तात्काळ चालकाला अटक करण्यात आले. ही कारवाई अनमोड अबकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक टी. बी. मल्लनावर यांनी केली. यावेळी कर्मचारी महंतेश हुन्नूर, रवी शंकर नवर, बसवराज गुड्डेनवर, सदाशिव राठोड उपस्थित होते.
भाजप आमदार सी.टी.रवीना अटक; खानापूर पोलिस स्थानकात ‘हायड्रामा’
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मंत्री व भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रात्री आठ वाजता त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले आहे. BJP MLC C.T. Raveena arrested; ‘Hydrama’ at Khanapur police station. Unparlimantory statement about Minister Laxmi Hebbalkar. सुवर्णसौधमध्ये विधान परिषदेत चर्चा सुरू असतांना […]