समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
- बहुतेकांना संसदेत खासदार म्हणून जाणारे दाम्पत्य म्हणून प्रमिला आणि मधू दंडवते माहिती आहेत. पण, त्याही आधी संसदेत जाणारे पहिले जोडपे कोण होते, याची माहिती बहुतेकांना नाही. कॅनरा आणि आताच्या उत्तर कन्नड मतदार संघातून पहिल्यांदा संसदेत जाणारे जोडपे म्हणून जोकीम अल्वा आणि व्हायलेट अल्वा यांची ऐतिहासिक नोंद आहे. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या स्नुषा माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यादेखील याच मतदार संघातून खासदार झाल्या होत्या.
मुळचे मंगळूरीयन असलेले जोकीम अल्वा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यातूनच त्यांचा देशातील तत्कालीन नेत्यांशी संपर्क आला. साहजिकच ते राजकीय प्रवाहात लोटले गेले. निष्णात वकील आणि व्यासंगी पत्रकार असलेले जोकीम अल्वा १९५२, १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
१९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अल्वा यांनी तत्कालीन कॅनरा मतदार संघातून विजय मिळवीला. त्याचवेळी त्यांच्या पत्नी व्हायलेट अल्वा यांनी राज्यसभेत खासदार म्हणून प्रवेश करण्याचा मान मिळविला. त्यावेळी संसदेत एकाचवेळी जाणारे हे पहिले आणि उच्चशिक्षित जोडपे होते.
जोकीम आणि व्हायलेट अल्वा यांच्यानंतर त्यांच्या घराण्यातून कुणीच राजकारणात सक्रीय नव्हते. पण, १९९९ च्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या खासदार झाल्या. दुसऱ्या म्हणजेच २००४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव निवेदीत अल्वा यांनी राजकारणात नशीब अजमावण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. त्यांच्या पक्षातील त्यांच्या हितशत्रूंनी त्यांना तग लागू दिला नाही. तरीही ते आजही सक्रीय आहेत.
२००८ साली स्टँप
भारतीय संसदेतील पहिले जोडले म्हणून जोकीम आणि व्हायलेट अल्वा यांच्या सन्मानार्थ २००८ तत्कालीन सरकारने त्यांचे छायाछित्र असलेले पोस्ट स्टँप प्रकाशीत केला आहे.
दंडवते दाम्पत्यही लोकसभेत
जेष्ठ विचारवंत, अर्थतज्ज्ञ मधू दंडवते यांनी रेल्वे आणि अर्थमंत्री म्हणून भरीव असे काम त्यांच्या कारकिर्दीत केले. १९८० साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मधू दंडवते राजापूर (कोकण) लोकसभा तर त्यांच्या पत्नी जेष्ठ समाजवादी नेत्या प्रमिला दंडवते या मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून विजयी होत. लोकसभेत पोहचले. महाराष्ट्रातून पहिल्यांदा एकाचवेळी लोकसभेत जाणारे जोडपे म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे.
मराठा सामाजाचे आधारस्तंभ: सुरेशराव साठे
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]