समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तालुक्यातील मान येथील शिंबोली धबधब्यात तरुण बुडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन तरुण धबधबा बघायला गेले होते. धबधब्याच्या डोहात पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो तरुण बुडल्याचे सांगितले जात आहे. शोध मोहीम सुरू आहे. तरुणाबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.
रामचंद्र चौगुले यांचे तालुक्याच्या विकासात अविस्मरणीय योगदान
खानापूर : खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती रामचंद्र चौगुले यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. तालुक्याच्या सहकार, राजकारण आणि समाजसेवेचा अध्याय त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण राहील. त्यांचे योगदान तालुका कधीही विसरणार नाही अशा शब्दात माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.हलकर्णी (ता. खानापूर) येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती […]