माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी
गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस उलगडून दाखविते ती भाषा होय. माणसाला अंतरंगात डोकावून पहायला शिकविते, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जेष्ठ साहित्यिक डॉ. बी.एम.हिर्डेकर यांनी केले.
माचीगड – अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य आकदमीने आयोजीत केलेल्या २८ व्या साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
संत तुकारामांनी भाषेला समृध्द केले. त्यांनी जे तत्वज्ञान मांडले ते चीरंतन आहे. परदेशी साहित्यिकांनी जे तत्वज्ञान अलिकडे मांडले ते तुकारामांनी अनेक दशकांपूर्वी लिहून ठेवले आहे. मराठी भाषेने अनेक अतिक्रमणे झेलली पण तरीही ही भाषचा टिकून आहे. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास इतका उशिर का लागला? असा प्रश्नदेखील यावेळी डॉ. हर्डिकर यांनी उपस्थित केला. भाषेचा द्वेष करून नका, सर्वच भाषांचा अस्वाद घ्यायला हवा. त्याशिवाय आपल्या मराठी भाषेचे अत्याधुणीकीकरण व्हायला हवे, तरच ती जागतीक प्रवाहात तरेल. त्यासाठी आधी राष्ट्रीय भाषांमध्ये आपले साहित्य कसे येईल याचा विचार व्हायला हवा. त्यानंतर ती आपोआपच जागतिक होईल, असे मत मांडतांनाच त्यांनी भाषा आणि साहित्य माणसाला माणूस व्हायला शिकविते. शहाणे व्हायला शिकविते. त्यासाठी आपली मातृभाषेवर निष्ठा असायला हवी, असेही ते म्हणाले.
प्रारंभी हभप संभाजी देसाई यांच्याहस्ते ग्रंथदिंडींचे उद्घाटन झाले. संत एकनाथ मंदिरापासून दिंडीला सुरूवात झाली. दिंडीत वारकरी टाळ-मृदंग, विद्यार्थी हातात मराठीचा महिमा सांगणारे फलक आणि मंगल कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी गावातील प्रत्येक घरासमोर लक्षवेधी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर पताकांनी गावाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर दिवंगत अजित सगरे साहित्य नगरीचे उद्घाटन निवृत्त प्राध्यापक झेड. बी.फर्नांडीस तर दिवंगत महादेव मोरे प्रवेशद्वाराचे उद्घाटन निवृत्त प्राचार्य पी.के.चापगावकर यांच्याहस्ते झाले.
दिपप्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, अभीजीत सरदेसाई, रफीक हलशीकर, के.पी.पाटील, विकास देसाई यांच्याहस्ते झाले. समाजसेवक दिवंगत सिध्दोजी पाटील सभागृहाचे उद्घाटन वसंत पाटील तसेच सुब्रम्हण्य विचारपिठाचे उद्घाटन कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते झाले. विविध देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष पीटर डिसोझा यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रृती गावडे, मोनेश गावडे, वैष्णवी हलगेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पडलवाडी येथील शिक्षक प्रकाश मादार, हलशीचे कृष्णाजी गुरव यांच्यासह अकादमीचे कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. पत्रकार विवेक गिरी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.पी.गिरी आणि संजीव वाटुपकर यांनी केले. आभार बाबुराव पाटील यांनी मानले.
भक्तीमुळे माणूस निर्भय बनतो: प्रा. राजा माळगी
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]