माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी
समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे मत वाळवा (जि.सांगली) येथील क्रांतीसींह नाना पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. राजा माळगी यांनी व्यक्त केले.
माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ साहित्य संमेलनातील तिसऱ्या सत्रात त्यांनी ‘ज्ञानेश्वरीतील भक्तीयोग’ या विषयावर व्याख्यान दिले.
प्रा. माळगी पुढे बोलतांना म्हणाले, ज्ञानेश्वरी लिहिण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा कांही तरी हेतू होता. त्या काळात समाजात अस्थिरता माजली होती. ती दूर करण्यासाठी माणसाला भक्तीयोगात गुंतविणे आवश्यक होते. तेव्हाही धर्माचा धंदा चालत होता. आजदेखील ही स्थिती बदलेली नाही. भयभीत झालेला माणूस अंधश्रध्देत गुरफटून जातो. त्यामुळे तो देवालाच अमिष दाखवितो. मुळात ज्ञानेश्वरांनी स्वर्ग ही संकल्पना अमान्य केली. देह देवस्वरूप झाला की भय संपते, माणूस निर्भय बनतो. त्यातूनच माणसाला देवत्व प्राप्त होते. तुकारामांनीदेखील हेच सांगितले आहे.
ज्ञानेश्वरांना मराठी मुलूख म्हणजे केवळ महाराष्ट्र अभिप्रेत नव्हता. जगभरात जेथे मराठी भाषिक राहतात, तो सगळा प्रदेशाशी त्यांची नाळ जोडली होती. याअर्थाने ज्ञानेश्वरांनी आधीच सीमाप्रश्न सोडविला आहे, असेही प्रा. माळगी म्हणाले.
कवितांनी घेतला रसिकमनाचा ठाव..
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवितांच्या जाऊ गावा हे कवी संमेलन पार पडले. या सत्राचे निवेदन प्रा.डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. कवी संजीव वाटुपकर यांच्या ‘थवे माणसांचे’ या कवितेने कवी संमेलनाची सुरूवात झाली. पुण्याचे कवी गोविंद पाटील यांनी त्यांची आरसा ही कविता सादर करून रसिकांच्या मनात प्रेम अंकुरले. रसिकांच्या चेहऱ्यावरची प्रेमाची लाली उतरण्यापूर्वीच त्यांनी बाबाची कविता खड्या आवाजात ऐकवून कृषी संस्कृतीची वेदना मांडली आणि वास्तवदर्शन घडविले. तसेच त्यांच्या कर्ज या कवितेने रसिकांना हसवता-हसवता अंतर्मूख व्हायला भाग पाडले.
रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळत नसल्याचे लक्षात येताच सांगलीचे कवी प्रा. संतोष काळे यांनी त्यांची ‘वाजलेली टाळी’ ही कविता सादर केली. टाळीचे महत्व सांगणाऱ्या या कवितेला रसिकांनी टाळ्याच्या कडकडाटाने दाद दिली. परदेशात राहणाऱ्या मुलाच्या वडिलांचे मनोगत त्यांनी ‘घुसमट’ या कवितेतून मांडत आजच्या विदारक स्थितीवर कवितेतून भाष्य केले. वातावरण अगदीच अंवेदनशील बनत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी प्रपंच ही कविता सादर करून उपस्थित रसिकांच्या प्रपंच या कल्पनेवर मोरपीस फिरविले. प्रपंच कसा असतो, हे त्यांनी या कवितेतून अधोरेखीत केले.
प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. बी.एम.हर्डिकर यांनी त्यांच्या ॠतूरंग या कविता संग्रहातील ‘या शहरांचं काय करायचं?’ या कवितेतून आजच्या शहरांची विदारक स्थिती तर मांडलीच शिवाय गावांच्या गावपणाचे महत्वदेखील स्पष्ट केले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी पाऊस आणि मुके श्वास ही कविता सादर करून महापूराचे भिषण चित्र रसिकांसमोर मांडले. कविता मरत नसते, असे सांगत त्यांनी कविता माणसाला विचार करायला भाग पाडते, असे नमूद केले.
अकादमीचे कौतूक
संमेलनाध्यक्ष डॉ. हर्डिकर यांच्यासह उपस्थित साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी सुब्रम्हण्य साहित्य अकादमीने सलग २८ वर्षे साहित्यसेवा अव्याहत सांभाळली असल्याबद्दल अकदामीचे कौतूक केले. ग्रामीण भागातील संमेलने ही अखील भारतीय संमेलनांहून वेगळी का आहेत? याची प्रचिती माचीगडातील संमेलनाने दिली असल्याचे डॉ. हर्डिकर म्हणाले.
कणकुंबीजवळ तरूणाचा बुडून मृत्यू
समांतर क्रांती / जांबोटी खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.२९) सायंकाळी घडली. या घटनेतील मृत महांतेश गुंजीकर (वय २७, रा.खासबाग-बेळगाव) हा बेळगाव येथील एका कंपनीचा कर्मचारी होता. याबाबतची अधिक माहिती अशी, मृत महांतेश हा त्याच्या कंपनीतील अन्य २२ कर्मचाऱ्यांसह पार्टीसाठी कणकुंबीजवळील रिसॉर्टमध्ये आला होता. सायंकाळी जलतरण तलावात […]