समांतर क्रांती / खानापूर
माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे २८ वे साहित्य संमेलन रविवारी (ता.२९) होणार आहे. कोल्हापूरचे साहित्यिक डॉ.बी.एम.हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. चार सत्रात हे संमेलन होणार असून चारही सत्राना महाराषष्ट्रातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत.
सुब्रम्हण्य साहित्य अकादमी गेल्या २८ वर्षांपासून संमेलन आयोजनाच्या माध्यमातून साहित्यसेवा करीत आहे. यंदाच्या संमेलनात डॉ.बी.एम. हर्डीकर हे अध्यक्षीय अभिभाषण देतील. दुसऱ्या सत्रातील ‘कवितांच्या जाऊ गावा’ या काव्य मैफलीत कविता सादर केल्या जाणार आहेत. या काव्यसंमेलानाला पुण्याचे जेष्ठ कवी प्रा. गोविंद पाटील आणि हलकर्णी येथील प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानेश्वरतील भक्तीयोग’ या विषयावर वाळवा – सांगली येथील साहित्यिक राजा माळगी यांचे व्याख्यान होईल.
चौथ्या सत्रात ठाण्याचे कथाकार हेमंत पाटील यांच्या कथाकथनाची मेजवाणी असेल. वास्तूविशारद ॲड. पिटर डिसोझा हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. साहित्यरसिकांनी संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, कार्याध्यक्ष कवी संजिव वाटुपकर, कार्यवाह एम.पी.गिरी यांनी केले आहे.
खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबीत
समांतर क्रांती / खानापूर येथील पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबीत करण्यात येत असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. सी.टी.रवी प्रकरणात केलेली हयगय मंजुनाथ नाईक यांना भोवली आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना खानापूरले आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक […]