समांतर क्रांती विशेष
कर्नाटक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आलेला महामेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न कर्नाटकी पोलीसांनी केला. मराठी भाषकांनी या कर्नाटकी दंडेलशाहीला चोख प्रत्यूत्तर देतांना बेळगावातील संभाजी चौकात जोरदार निदर्शने करीत मराठी बाणा दाखवून दिला. एकीकडे मराठी भाषीकांनी कर्नाटकी प्रशासनाची पाचावर धारण बसविली असतांना पोलीस बळाचा वापर करून सुमारे ७८ मराठी भाषीकांना अटक करण्यात आली. दुसरीकडे कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने निघालेल्या शिवसैनिकांना (उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना) कोगनोळी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले. कर्नाटकांने महामेळावा उधळून कंडू शमवून घेतला. महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र सीमावासीयांकडे साफ दुर्लक्ष केले.
महामेळावा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती, तरीही कोणत्याही स्थितीत महामेळावा भरविणारच, असा निर्धार मराठी भाषीकांनी केला होता. परंतू, पोलीसांनी पाच ठिकाणी जमावबंदी लागू करून प्रचंड असा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. शिवाय पहाटेपासूनच मराठी नेते-कार्यकर्त्यांना अटक करून आवाज दडपण्यास सुरूवात केली. पोलीसांनी बळाचा वापर करण्यास सुरूवात केल्याने कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात जमून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. राहणार तर महाराष्ट्रातच; नाहीतर जेलमध्ये यासह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलीसांच्याा दंडेलशाहीला आव्हाण दिल्याने पिसाळलेल्या पोलीसांनी ठिकठिकाणी धरपकड करीत ७८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यातील कांहीना एपीएमसी तर कांहीना मारिहाळ पोलीस स्थानकात दिवसभर नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथेही पोलीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी करीत मराठी भाषीकांनी पोलीसांची त्रेधातिरपीट उडवून दिली.
कोल्हापूरहून बेळगावला निघालेल्या उध्दव ठाकरेच्या सुमारे ८० सैनिकांना कोगनोळी नाक्यावर अटक करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे आणि संजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे सैनिक बेळगावला निघाले होते. दरम्यान, महाराष्ट्रीत नेते-कार्यकर्ते बेळगावात येऊ नयेत, यासाठी बेळगावला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. एकंदर, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश हे स्वत: मराठी भाषिकांना अटक करण्यात गुंतले होते. असातांनाही मराठी भाषीकांनी मराठी आवाज बुलंद करीत पोलीसांच्या नाकीनऊ आणले.
कर्नाटक सरकारच्या दंडुकेशाहीला जशास तसे उत्तर दिले जात असतांना महाराष्ट्र सरकार मात्र रसद पुरविण्यात कमी पडल्याबाबत मराठी भाषीकांत नाराजी व्यक्त होत होती. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वगळता कोणत्याच पक्षाच्या नेत्यांने कर्नाटकी दंडेलशाही ब्र देखील काढला नाही. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले. तर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे निदर्शने करण्यात आली. त्याची दखल सुध्दा महाराष्ट्र सरकारला घ्यावीशी वाटली नाही. महाराष्ट्र सकरारच्या या भूमिकेबाबत मराठी भाषिकांत संताप व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांचे निधन
समांतर क्रांती / बंगळूर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा (सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा) यांचे मध्यरात्री २.४५ वाजता निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी बंगळूर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या कांही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. Former Chief Minister S.M. Krishna passes away. कॉग्रेसमधून राज्याचे मुख्यमंत्री झालेले एस.एम.कृष्णा […]