समांतर क्रांती / बेळगाव
बेळगाव नव्हे, मुंबईलाच केंद्रशासीत करावे, अशी मागणी करीत अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आकलेचे तारे तोडले. यापूर्वीही त्यांनी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना मराठीतून बोलण्यास विरोध करीत मराठी विरोधी गरळ ओकली होती.
बेळगावमधील लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधीत्व केले असल्याने मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी मुक्ताफळे आमदार सवदींनी उधळली. महाराष्ट्रातील नेते बेळगाववर हक्क सांगत केंद्रशासीत करण्यात यावे अशी मागणी करीत आहेत. पण, मुंबईवर आमचा हक्क असल्याने मुंबईच केंद्रशासीत करावी, असा जावईशोध त्यांनी कर्नाटक विकास विषयावरील चर्चेदरम्यान लावला.
एकंदर, भाजपचे राष्ट्रीय नेते मुंबईवर डोळा ठेवून असतांना पूर्वाश्रमीचे भाजप नेते असलेले आमदार सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांचा ‘सुभ जळाला तरी पीळ गेला नसल्या’चे त्यांच्या बेताल वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच आमदार सवदी यांचा सीमाभागातून तीव्र निषेध केला जात आहे.
नंदगड आणि बिडीला नगर पंचायतीचा दर्जा द्या
समांतर क्रांती / बेळगाव खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बिडी ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दजार देण्याची मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज बुधवारी विधानसभेत केली.उत्तर कर्नाटक विकासासंदर्भातील चर्चेवेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणीही केली. यावेळी बोलतांना श्री. हलगेकर म्हणाले, खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका आहे. […]