
समांतर क्रांती / खानापूर
हळदी-कुंकू हा हिंदुच्या परंपरेतील महत्वाचा कार्यक्रम आहे. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना त्यांच्या नेहमीच्या धबागड्यातून विरंगुळा मिळतो. शिवाय त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. मणतुर्गा येथील ग्रामस्थ, पंच कमिटी व देव रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटीने ही संधी येथील महिलांना देऊन एकप्रकारे नारीशक्तीचा मानसन्मान करीत आदर्श निर्माण केलेला आहे, असे मत निवृत्त मुख्याध्यापिका अरूंधती दळवी यांनी व्यक्त केले.
मणतुर्गा येथील श्री देव रवळनाथ मंदिराच्या जीर्णद्धारनिमित्ताने हळदी कुंकू समारंभात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सोमवारी (ता.२०) उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील तर स्वागताध्यक्षा सौ. अश्विनी राजाराम गुंडपिकर होत्या.
द्वीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल. हळदी कुंकूनिमित्त आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त मुख्याध्यापिका सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांच्या हस्ते झाले. गणेश पूजन सौ. साधना बाळाराम शेलार, श्री देव रवळनाथ पूजन सौ. समृध्दी गजानन गुरव यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणुन ऍडव्होकेट सौ. अंकिता गौतम सरदेसाई उपस्थित होत्या. प्रसंगी कु.चित्रा बाबाजी गुंडपीकर हिने गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री देव रवळनाथ मंदिर बांधकामासाठी महिलांनी देणगी जाहीर केली. त्यात सौ.अरुंधती आबासाहेब दळवी यांनी ११ हजार १११, सौ. शांता शांताराम पाटील ५ हजार ४५१, सौ. साधना बाळाराम शेलार ५ हजार ३१, सौ. कोमल विश्वनाथ देवकरी, सौ. सुजाता श्रीपती देवकरी यांनी प्रत्येकी ५ हजार, सौ. रुपाली यलाप्पा मांगीलकर २ हजार १२१, सौ. सुप्रिया मारुती पाटील, कु. चित्रा बाबजी गुंडपीकर यांनी प्रत्येकी २१००, सौ. लक्ष्मी प्रकाश गुरव, सौ. सत्यवा जोतिबा गुरव, सौ. स्नेहल संजय गुरव यांनी प्रत्येकी ११००, सौ. उषा पुंडलिक देवलतकर १ हजार १९, सौ. स्नेहल गंगाराम चोर्लेकर १०११, सौ. भागीरथी बळवंत देसाई, सौ. अनुराधा अरविंद शेलार, सौ. स्वाती विजय पाटील, सौ. निकिता नारायण देवलतकर यांनी प्रत्येकी एक हजार तसेच इतर उपस्थित महीलांनी प्रत्येकी ५०० प्रमाणे देणगी दिली
कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत श्री आबासाहेब दळवी यांनी केले तर प्रास्ताविक श्री बाळासाहेब शेलार यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री मारुती देवकरी यांनी केले, शेवटी आभारप्रदर्शन शांताराम पाटील यांनी केले.
म्हादईसंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात
समांतर क्रांती / पणजी म्हादई संदर्भात आज गुरूवारी (ता.२३) सुनावणीची शक्यता होती. पण, ११७ व्या क्रमांकावर असेलली गोव्याची याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढील आठवड्यात होईल, असे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी म्हटले आहे. म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकाकडून सुरू असलेले काम बंद करावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली जाणार होती. त्यासाठीची सगळी तयारी […]