समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर
केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या नव्या निकषानुसार देशातील सर्व राज्यात मान्सून पसरायला ३८ दिवस लागतात. पूर्वीच्या निकषानुसार ४५ दिवस लागत होते.
२०१३ मध्ये मान्सूनचा चपळ डाव
भारतीय शेती ही पूर्णत: मान्सूनवर आवलंबून आहे. साहजिकच शेतकऱ्यांसह सर्वच जण मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जूनला प्रवेश करतो. तेथून मजल-दरमजल करीत तो सरासरी ३८ दिवसात देशातील इतर राज्यात पोहचतो. २००२ मध्ये मान्सूनला देशभरात पसरायला सर्वाधिक ७८ दिवस लागले होते. २९ मे रोजी केरळात दाखल झालेला मान्सून २० ऑगस्ट रोजी देशभरात पोहचला होता. तर २०१३ मध्ये मान्सूनने चपळ डाव साधला होता. आवघ्या १५ दिवसात मान्सूनने देशभरात जम बसविला होता.
यंदाही वाटचाल धिम्यागतीने
यंदा मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल झाला होता. पण, वादळामुळे मान्सूनची वाटचाल दबक्या पावलांनी झाली. अजुनही मान्सूनला जोर नसल्याने केरळसह कर्नाटक, महाराष्ट्रात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यंदाची मान्सूनची वाटचाल शेतकऱ्याची चिंता वाढविणारी आहे. दक्षिण भारतातच अद्याप पावसाचा जोर नसल्याने उत्तर भारतातील राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. येत्या कांही दिवसांत दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली असून जुलै अखेरपर्यंत मान्सून देशभरात व्याप्ती वाढवेल, अशी आपेक्षा आहे.
खत विक्री घोटाळा: अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करा!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नंदगड येथील मार्केटींग सोसायटीने खत विक्रीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीही सोसायटीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. सदर अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा म.ए.समितीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, […]