मणतुर्गा येथील सभेत ईश्वर बोबाटे गरजले; ॲड, घाडी, बिर्जे आणि मुतगेकरांनी डागली तोफ
खानापूर: गेल्या तीस वर्षांपासून भाजप तालुक्यातील लोकांना नागवीत आहे, आता खूप झालं. त्यामुळेच आम्ही काँग्रेसच्या सोबत समर्थपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आपल्या तालुक्यातील उमेदवार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच विजयी करायचं हे ठरलंय, जनतेनेदेखील डॉ. बनंबाळकर यांनाच विजयी करण्यासा चंग बांधला असल्याने भाजप यावेळी हद्दपार होणारच, असा मनोदय युवा नेते ईश्वर बोबाटे यांनी मणतुर्गा येथील सभेत व्यक्त केला. यावेळी अध्यक्षस्थानी वासुदेव अप्पाजी पाटील होते. यावेळी मणतुर्गावासीयांनी हात उंचावून डॉ. निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलतांना यशवंत बिर्जे म्हणाले, मणतुर्गा गावाने आतापर्यंत सत्याची बाजू घेत त्यांचा कौल दिली आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या डॉ. अंजलीताईंना मतदान करणार याबाबत मला तरी शंका नाही. डॉ. निंबाळकर या आपल्या तालुक्यातील उमेदवार आहेत, बाहेरचे उमेदवार कोण हे मी सांगायची गरज नाही. एक गोष्ट निश्चित आहे, यावेळी फक्य आणि फक्त ताईच.
ग्राम पंचायत असोशीएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकरांनी तोफ डागतांना आम्ही तालुक्यातील समस्यांसदर्भात अनेकवेळा खासदार अनंतरकुमार हेगडे यांची भे घेतली. त्यांनी केवळ आश्वासने देण्यालिकडे कांहीच केले नाही. रस्ता चांगला झाला तर अपघात होतील, म्हणून रस्ता करीत नाही, असे उत्तर देणारा खासदार केवळ येथेच भेटतो. हीच भाजपची नीती आहे, त्यामुळे आता भाजपला हद्दपार करून काँग्रेसला सत्तेत आणण्याची गरज आहे. ईश्वर बोबाटे यांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका सर्वांनी घेऊन काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत मांडले.
यावेळी ॲड.ईश्वर घाडी, जयवंत भीमा पाटील, विलास गणपती पाटील, महादेव नारायण पेडणेकर, निल्लाप्पा नारायण कानसीनकोप, महादेव अमृत पाटील, मोहन गावडे पाटील, दशरथ रामा देवकरी, लक्ष्मण शेला, शामराव देसाई, सुरेश लोहार, अमृत पांडुरंग बोभाटे, मोहन महादेव शेंदोळकर तुकाराम नारायण पेडणेकर, महेश गणपती पाटील, राजाराम गुंडपीकर आदींसह खानापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ईश्वर बोबाटे यांच्या नेतृत्वाखाली गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील नागरीकांनी डॉ. निंबाळकरांना पाठिंबा जाहीर करीत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पाच गॅरंटीचा भाजपला फटका, काँग्रेसचा वारू उधळला!
डॉ. निंबळकरांचा विजय निश्चित; कागेरींची प्रचारात पिछेहाट कायम कारवार: मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसा, प्रचाराचा वारू उधळला आहे. भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही, त्या तुलनेत पाच गॅरंटी राबवून काँगेसने मतदार संघाची मशागत केली आहे. परिणामी, डॉ. अंजली निंबाळकर यांचा कारवार (उत्तर कन्नड) मतदार संघातील विजय निश्चित मानला जात आहे. कागेरी यांच्यावरील आरोपांचे अंडन करण्यात आलेले […]