खानापूर: मणतुर्गे येथील रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील होते.
प्रारंभी रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी विष्णू गुंडू गुरव आणि सौ. लक्ष्मी विष्णू गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिक नारायण गुंडपीकर, वासुदेव पाटील, विठोबा देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव पाटील आणि खानापूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेचे चेअरमन अमृत महादेवराव शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कॉलम भरणी शुभारंभ मध्यवर्ती म.ए.समितीचे सदस्य गोपाळ पाटील यांच्यासह गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी जि. पं. सदस्य विशाल पाटील, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, लैला शुगरचे व्यवस्थापक बाळासाहेब शेलार, वसंत गुंडपीकर, शिक्षक मष्णू चोर्लेकर, कृष्णाजी देवलतकर यांनी मंदिर उभारणी संदर्भात मौलीक विचार मांडले.
मंदिर उभारणीसाठी मान्यवरांनी १ लाख ४१ हजार रुपयांची देणगी दिली. स्वागत मंदिर जीर्णोद्धार कमिटी सदस्य प्रकाश नारायण पाटील तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मंदिर जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले.
त्या खोटारड्यांना देवही माफ करणार नाही
डॉ. निंबाळकर यांना भरघोस पाठिंबा; हल्याळ तालुक्यात प्रचाराचा धडाका हल्याळ: भाजपच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून देशातील भोळ्या भाबड्या जनतेने दहा वर्षे त्यांच्या हाती सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी खोटे बोलण्याचा उद्योग सोडला नाही. अशा खोटारड्यांना देवही माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत तरुणांच्या व देशाच्या भविष्यासाठी भाजपला धडा शिकवा असे आवाहन उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघाच्या […]