
समांतर क्रांती / खानापूर
पूर्वी महिला चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादीत होत्या. आज विविध क्षेत्रात मजल मारली आहे. पण, हे होत असतांना आधुनिकीकरणात गुरफटलेली महिला मोबाईल, टिव्हीसारख्या यंत्रणांच्या गुलाम बनत चालल्या आहेत, ही पुन्हा महिलांना गुलामगिरीकडे घेऊन जाणारे षड्यंत्र आहे. ते वेळीच ओळखून मोबाईल, टीव्हीतूनही आपणे आपल्या संसारासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी चांगले कांही देऊ शकतो. त्यासाठी त्यांचा वापर करावा, असे आवाहन सॉफ्टवेअर अभियंत्या सौ. सुषमा शेलार यांनी केले.

तालुक्यातील मणतुर्गा येथील रवळनाथ मंदिर जिर्णाध्दार समितीने नुकताच गावातील माहेरवासिणींचा आगळा-वेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या या नात्याने बोलत होत्या.
प्रसंगी मानाचा फेटा आणि वाण देऊन शेकडो माहेरवासिनींना यावेळी सन्मानीत करण्यात आला. एकाचवेळी शेकडो माहेरवासिनींना निमंत्रीत करून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या माहेरवासिनींना यानिमित्ताने एकमेकांची गळाभेट घेण्याची संधी सुध्दा मिळाली.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ. अंकिता पाटील होत्या. दिपप्रज्वलन लक्ष्मी गुरव, शारदा देवलतकर, सुमित्रा देसाई, अंकिता देवकरी, विजयालक्ष्मी पाटील, सुप्रिया गुंडपीकर, भाग्यश्री देसाई, प्रभावती गुंडपीकर, प्रणोती पेडणेकर यांच्या हस्ते झाले.प्रसंगी विविध देव-देवतांच्या प्रतिमांचे पूजन स्वागताध्यक्षा चित्रा पाटील, लक्ष्मी गुरव, स्नेहल पाटील, वैभवी देसाई यांनी केले.
यावेळी ३०० हून अधिक माहेरवासिनींचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी रवळनाथ जिर्नोध्दार समितीने गावातील महिलांचाही अशाच पध्दतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमात माहेरवासिनींनी मंदिराच्या उभारणीसाठी रु. ३ लाख ५१ हजारांची देणगी दिली. प्रारंभी जिर्नोध्दार कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार प्रल्हाद मादार यांनी केले तर सौ. शांताबाई पाटील यांनी आभार मानले.

भाजपवाल्यांनो, श्रेय लाटणे बंद करा: ॲड. ईश्वर घाडी यांचा सल्ला..
समांतर क्रांती / खानापूर काँग्रेसच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे नेते जणू आसुसले आहेत, त्यांनी श्रेय लाटणे बंद करावे, असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी दिला आहे. मणतुर्गा येथील शाळेच्या दुरूस्तीसाठी मंजूर झालेल्या निधीबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत खुलासा करतांना भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, असेही सांगितले. मणतुर्गा (ता. खानापूर) येथील मराठी शाळेची […]