समांतर क्रांती / खानापूर
गेल्या दहा वर्षांपासून खड्ड्यांनी साम्राज्य प्रस्तापीत केलेल्या रुमेवाडी नाका ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची डागडूजी व्हावी, यासाठी अनेकवेळा आंदोलने, अर्ज विनंत्याा करून पाठपुरावा करण्यात आला होता. आता या भागातील प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे.
शेडेगाळी ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय आवस्था झाली होती. हारूरी फाटा आणि रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून अपघात घडत होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनले होते. रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत असतांना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान, मणतुर्गा येथील काँग्रेसचे नेते ईश्वर बोबाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी आंदोलने सुध्दा करण्यात आली होती.
नागरीकांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता अनमोड मार्गे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची दयनीय आवस्था होती. आम्ही आमचे कार्यकर्ते आणि या भागातील नागरीकांनी यासाठी पाठपुरावा चालविला होता. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतरही ते दर्जेदार व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार संबंधीत अधिकारी आणि कंत्राटदाराने रस्त्याचे काम पुर्ण केले असून ही समस्या सुटली आहे.
- ईश्वर बोबाटे, काँग्रेस नेते मणतुर्गा
‘अंगणवाडी’च्या घोटाळ्यांची जंत्री
गावगोंधळ / सदा टिकेकर बालवाडीची अंगणवाडी झाल्यापासून खानापूर तालुक्यात घोटाळ्यांनी जन्म घेतला. खरंतर लहान मुलांना अक्षर ओळख व्हावी, यासाठी अंगणवाडींची सुरूवात झाली. पण, तालुक्यातील राजकारण्यांनी घोटाळे करून या उपक्रमावर अगदीच ‘शि-सू’ करून घाण करून ठेवली आहे. आता राष्ट्रीय पक्षांची सत्ता तालुक्यात आल्यानंतर तरी ही परंपरा खंडीत होईल, असे वाटले असतांना भाजपच्या एका नेत्यांने ‘ना खाऊंगा, […]