मणतुर्गे तालुका खानापूर येथे गुढीपाडवा निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले.
नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. आबासाहेब नारायणराव दळवी अध्यक्ष श्री रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार कमिटी मणतुर्गे, तसेच पुढील रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार कमिटी सदस्य सौ. व श्री. बाळासाहेब महादेव शेलार, सौ. व श्री. प्रकाश नारायण गुरव, सौ. व श्री. शांताराम बाजीराव पाटील, श्री. मल्लाप्पा धाकलू देवलतकर, सौ. व श्री, प्रकाश नारायण पाटील, सौ. व श्री दत्तू नारायण पाटील, सौ. व श्री नामदेव गुंडू गुरव, सौ. व श्री मर्याप्पा रावबा देवकरी, सौ. व श्री प्रभाकर नागाप्पा बोबाटे, सौ. व श्री रामलिंग विठोबा चोर्लेकर, सौ. व श्री विजय दत्तू भटवाडकर, सौ. व श्री बळवंत महादेव देसाई, सौ. व श्री दिपक महादेव पाटील, श्री नागेश सटवाप्पा मादार इत्यादींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गावडू नारायण पाटील हे होते, गणेश पूजन श्री रामचंद्र श्रीपाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रवळनाथ पूजन श्री विनायक मधू गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. सातेरी माउली पूजन श्री प्रकाश नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन श्री अमृत महादेव शेलार अध्यक्ष खानापूर को-ओपरेटीव्ह बॅंक, श्री अण्णाप्पा सातेरी पाटील अध्यक्ष पीकेपीएस मणतुर्गे, श्री सुधीर रघूनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष गाव पंच कमिटी, श्री सुभाष गणपती पाटील अध्यक्ष केएमएफ मणतुर्गे, श्री प्रेमानंद कल्लाप्पा पाटील पंचकमिटी सदस्य मणतुर्गे, श्री प्रदीप परशराम पाटील कार्याध्यक्ष पंचकमिटी मणतुर्गे, श्री संजय शिवाजी देवलतकर सहसेक्रेटरी पंचकमिटी मणतुर्गे, श्री श्रीपाद महादेव देवकरी माजी ग्रामपंचायत सदस्य मणतुर्गे, श्री प्रल्हाद दशरथ मादार अध्यक्ष एसडीएमसी मणतुर्गे, श्री ईश्वर मंगेश बोबाटे माजी अध्यक्ष एसडीएमसी मणतुर्गे, श्री गजानन विष्णू गुरव अध्यक्ष बालगणेश मंडळ मणतुर्गे, श्री मारुती सटवाजी पाटील अध्यक्ष गणेश चौक गणेशोत्सव मंडळ मणतुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. मंगलकलशधारी सुहासिनींचा सत्कार सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांनी भगवी शाल अर्पण करून केले तर उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचेही स्वागत भगवी शाल व टोपी घालून करण्यात आले.
प्रवेशद्वार चौकट आणि गाभारा चौकटीची मिरवणूक श्री सातेरी माउली मंदिरापासून सुरू करून संपूर्ण गावांतून काढण्यात आली. यावेळी घरोघरी सुहासिनींनी चौकटीचे औक्षण केले, बालशिवाजी भजनी मंडळींनी भजन गायन करत मिरवणुकीला शोभा आणली. सायंकाळी सात वाजता श्री विठ्ठल मंदिर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मष्णू चोर्लेकर यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत श्री आबासाहेब दळवी यांनी केले.