समांतर क्रांती / साखळी
दुसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी साहित्यिक राजेंद्र केरकर यांनी निवड करण्यात आली आहे. साखळी (गोवा) येथे १९ जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होणार असून स्वागताध्यक्ष ॲड. यशवंत गावस असतील.
गोमंतक मराठी अकादमी आणि मराठी असे आमची मायबोली या संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीतील राधाकृष्ण मंदिरात होनाऱ्या या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन तसेच ‘मराठी भाषेची अपरिहार्यता’ व ‘मराठी भाषा व युवक’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. त्याशिवाय कविसंमेलनही होणार आहे.
या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना नुकताच निमंत्रण देण्यात आले. साहित्य रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पहाटे आयकरचा छापा; धागेदोरे बेळगावपर्यंत?
समांतर क्रांती Income tax raid बंगळूर: आयकर खात्याने आज मंगळवारी (ता.१७) पहाटेच बंगळूर महानगरातील पाच ठिकाणी बिल्डर्सची निवासस्थाने व कार्यालयांवर छापा मारला. अचानक झालेल्या या कारवाईने राज्यभरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्समध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या छाप्याचे धागेदोरे बेळगावसह राज्यातील विविध शहरांशी जुळले असल्याचे समजते. पहाटेपासून सुरू झालेली छापेमारी आणि कागदपत्रांची तपासणी अद्यापही सुरू आहे.