
खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा रविवार दि. 23 फेब्रुवारीला होणार असून तालुक्यातील विध्यार्थ्यानी परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले आहे. ही परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे.
मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल येथे सकाळी 10.30 वा. प्राथमिक आणि माध्यमिक गटासाठी एकाच वेळी परीक्षेला सुरवात होईल. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गेल्या 10 वर्षांपासून या तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या धर्तीवर या परीक्षेचे स्वरूप आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि ओएमआर उत्तर पत्रिका याद्वारे ही परीक्षा घेतली जाते.
प्राथमिक विभागासाठी अनुक्रमे 3500, 2500, 2000, 1500, 1000, 800, 700 माध्यमिक विभागासाठी 4000, 3000, 2500, 2000, 1500, 1200, 1000 अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा खानापूर तालुका मर्यादित असून विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. 21 पर्यंत दै. पुढारी कारयालय वाझ बिल्डिंग दुसरा मजला, मिनी विधानसौधसमोर, खानापूर येथे नावे नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी नारायण कापोलकर (मो. 9449582080), वासुदेव चौगुले (9901070234), ईश्वर बोबाटे (9945384531) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

खानापूर : गेल्या महिनाभरात काय घडलं, काय बिघडलं?
समांतर क्रांती / विशेष (पूर्वार्ध) गेल्या महिनाभरात खानापूर तालुक्यात अनेक स्थित्यंतरे घडलीच. त्यातही रामगुरवाडीच्या हुडगम्मा आणि सातेरी माऊली देवीच्या यात्रेने सुरू झालेला महोत्सवांचा सिलसिला नंदगड आणि सन्नहोसूर येथील महालक्ष्मी यात्रेने ओसरला. त्यातही अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांनी या महिन्यावर काळाची पडछाया दिसून आली. नंदगडची वेगळा संदेश देणारी यात्रा.. नंदगड गावाने आणि या परिसराने समाज परिवर्तनाची […]