समांतर क्रांती वृत्त
खानापूर: दुष्काळग्रस्त तालुक्यातून खानापूरला वगळण्यात आले असून त्याबाबत फेरविचार व्हावा आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी खानापूर तालुका म.ए.समितीने केली आहे. यासंदर्भात बुधवारी तःशीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुःखद..
निधन वार्तानागुर्ड (ता.खानापूर) येथील गणपती (भैय्या) लक्ष्मण महाजन (वय 17) याचे दीर्घकालीन आजाराने आज गुरुवारी (ता 31) सकाळी 10 वाजता निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा, काका-काकू, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लैला साखर कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण महाजन आणि माजी ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मी महाजन यांचा […]