समांतर क्रांती वृत्त
खानापूर: विधानसभा निवडणुकीतील नामुष्कीजन्य पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या आणि मराठी भाषीकांच्या मागणीचा आदर ठेवत पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले. समितीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याने त्याठिकाणी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात सोमवारी शिवस्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, बैठकीत निवडीसंदर्भातील चर्चेऐवजी कार्यकर्त्यांनी नेत्यांना कानपिचक्या देत पुढील काळात तरी शहाणे व्हा असा सल्ला दिला. नेते चुकले म्हणून पराभव पत्करावा लागला असा बैठकीतील सूर होता.
नवी कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या म.ए.समितीच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेली ही बैठक फार्सच ठरली. निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अध्यक्षपदावरून बोलतांना केल्याने मराठी भाषिकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलतांना माजी ता.पं.सदस्य विठ्ठल गुरव सीमालढ्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, पण नेत्यांनी निष्ठावंतांना कार्यकारीणीत स्थान देऊन संघटना कार्यक्षम बनवावी, केवळ अश्वासने देऊन कांही साध्य होणार नाही. त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच मराठी माणूस पुन्हा समितीकडे वळेल, असे सांगितले. समिती नेते डी.एम.गुरव, ॲड. अरूण सरदेसाई यांनी समितीने केवळ राजकारण न करता सीमालढ्याबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठविण्याची गरज व्यक्त केली. प्रा.शंकर गावडा यांनीही समितीने पायाभूत योजनांवर काम करण्याची आपेक्षा व्यक्त केली.
माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी आमची निवड मध्यवर्तीने केली असल्याने आम्ही राजिनामेही मध्यवर्तीकडेच देऊ असे सांगत राजिनाम्याच्या विषयालाच फाटा देण्याचा प्रयत्न केला. पण, माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी यापूर्वी कधीच कार्यकारीणी निवडीत मध्यवर्तीने हस्तक्षेप केला नव्हता. यापुढील काळातही तो होऊ नये, अशी आपेक्षा व्यक्त करून राजिनामे स्विकारले जाऊन नव्या कार्यकारीणीची निवड केली जावी असे आवाहन केले. त्यानंतर श्री बिर्जे यांनी त्यांच्या या मताला सहमती दर्शविली. मुरलीधर पाटील यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास असून संघटना बांधणीवर भर देण्याची गरज व्यक्त केली.
निवड समिती गठीत करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत त्या विषयावर अगदीच त्रोटक चर्चा झाली. या ‘व्यापक’ ३४ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यातही अनेकांनी बैठकीत मौनम् सर्वार्थ साधनंम् अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.
केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून इतर राज्यात कधी पोहचतो?
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल […]