
समांतर क्रांती / खानापूर
मराठी भाषिकांनी हेवेदावे सोडून एकत्र येणे हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, असे मत मराठी नेत्यांनी व्यक्त केले. गेल्या कांही वर्षात अनेक कारणांनी मराठी भाषिक विभागला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याबरोबरच लढ्याला पुन्हा एकदा नवी उभारी देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
येथील हुतात्मा नागाप्पा होसुरकर स्मारकासमोर सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित समिती नेत्यांनी स्मारकास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पन केले. प्रसंगी बोलतांना माजी आमदारा दिगंबर पाटील यांनी सीमालढा जिवंत ठेवण्यासाठी हुतात्म्यांचे स्मरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.

प्रसंगी तालुका म.एसमितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सहचिटणीस रणजीत पाटील, खजीनदार संजीव पाटील, पांडुरंग सावंत, नारायण कापोलकर, गोपाळ पाटील, विठ्ठल गुरव, बाळासाहेब शेलार, ॲड. अरूण सरदेसाई, विलास बेळगावकर, पुंडलिक कारलगेकर, जग्गनाथ बिर्जे, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत देसाई, मऱ्याप्पा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुका समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील अभिवादन आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

‘गांधी भारत’ला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार
समांतर क्रांती / खानापूर बेळगावात २१ रोजी होणाऱ्या ‘गांधी भारत’ अधिवेशानानिमित्त आयोजीत जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. बिडी येथील कक्केरी जिल्हा पंचायत मतदार संघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध निषयावर चर्चा केली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, महिला घटक अध्यक्षा […]