काळ्यदिनी एकीची संभाव्य प्रक्रिया रखडल्यामुळे गर्लगुंजी येथील माऊली ग्रूप आणि समितीनिष्ठ मराठी भाषिकांनी मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांची बेळगावात भेट घेतली होती. एकी घडवून आणण्यासाठी मध्यवर्तीच्या नेत्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (ता. ०७) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, कांही अपरिहार्य कारणास्तव बैठक रद्द करण्यात आली होती. सदर बैठक बुधवारी (ता. ०९) सकाळी होणार आहे. कोणत्याही स्थितीत खानापुरातील समितीच्या दोन्ही गटात एकी घडवून आण्यात येणार असल्याने मराठी भाषिकांत उत्साह आहे.
तालुक्यातील मराठी भाषिकांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मते मांडावीत, असे मध्यवर्तीकडून कळविण्यात आले आहे. ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्तीचे शिष्टमंडळ यावेळी कार्यकर्त्यांची मते आजमाविणार आहे.
चोर शिरजोर, खाकी कमजोर
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरीचे लोण ग्रामिण भागात पोहचल्यामुळे ही अधिक चिंतेची बाब बनली आहे. भात कापणी, ऊसतोड हंगामामुळे गावांमध्ये असणाऱ्या शुकशुकाटाचा फायदा उठवित चोरटे दिवसाढवळ्या हात साफ करून घेत आहेत. बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील चोरीचे प्रमाण अधिक असून या बहुतेक चोऱ्या ‘धाडसी चोरी’ या […]