समांतर क्रांती न्यूज
खानापूर: तालुका म.ए.समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे निमंत्रक माजी ता.पं.सभापती मारूती परमेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मराठी भाषिकांत यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून पुन्हा समितीची मोट बांधण्यासाठी सक्षम कार्यकारिणीची गरज आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहवे. जे कोणी नाराज आहेत, त्यांनीदेखील बैठकीला उपस्थित राहून त्यांची मते मांडावीत, असे आवाहन मारूती परमेकर यांनी केले.
मराठी भाषिकांवरील अन्याय, कानडीकरण यासारख्या मराठीविरोधी कृती वाढल्या आहेत. त्यासाठी समितीची कार्यकारीणी सक्षम असणे ही सध्याची गरज आहे. समिती केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून सीमाप्रश्न आणि मराठीसाठीच्या लढ्यातील संघटना आहे. त्यामुळे कार्यकारीणी सर्वसमावेशक असेल. दि. 3 रोजी होणाऱ्या बैठकीत निवड समिती गठीत केली जाईल व त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन कार्यकारीणीची निवड जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली.
सावरगाळीतून वाघ गेले, हत्ती आले
समांतर क्रांती न्यूज खानापूर: मागिल महिन्यात वाघांच्या मुक्त संचाराने सावरगाळीत भितीचे वातावरण होते. वाघ गेल्यानंतर आता हत्तींचे आगमन झाले असून पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन हत्ती गेल्या चार दिवसांपासून या परिसरात मुक्त संचार करीत असल्याचे नागरीकांनी समांतर क्रांतीशी बोलतांना सांगितले. आनंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात नेहमीच श्वापदांचा वावर असतो. गेल्या महिन्यात दोन वाघांनी शेतकऱ्यांना […]