
समांतर क्रांती / पणजी
म्हादई संदर्भात आज गुरूवारी (ता.२३) सुनावणीची शक्यता होती. पण, ११७ व्या क्रमांकावर असेलली गोव्याची याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढील आठवड्यात होईल, असे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी म्हटले आहे.
म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकाकडून सुरू असलेले काम बंद करावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली जाणार होती. त्यासाठीची सगळी तयारी गोव्याकडून करण्यात आली होती. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. ती आता पुढील आठवड्यात होईल. दरम्यान, आजच्या सुनावणीची शक्यता गृहीत धरून गोव्याचे जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, अधिक्षक अभियंता दिलीप नाईक यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य दिल्लीला गेले होते. पण, कांही कारणास्तव गोव्याची याचिका खंडडपीठासमोर आली नाही.
प्रशासनाचा गलथान कारभार; मृतदेहाचाही भूईला भार..
समांतर क्रांती / वृत्तविश्लेषण ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ या म्हणीला जोडून आता ‘असतील शीतं तर जमतील प्रशासकीय भूतं’ अशी नवी म्हण खानापूर तालुक्यात रुळत चालली आहे. जेथे हात ओले आणि खिसे गरम होती, तेथेच अधिकारी आणि कर्मचारी वेळेत हजर होतात. जेथे कांहीच हाताला लागणार नाही, तेथे ते जातीलच याबाबत शंका असते. मग, एखाद्या ठिकाणी […]