समांतर क्रांती वृत्त
खानापूर: माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आता सहकार क्षेत्रात पदार्पण केले आहे. यापूर्वी त्या निट्रूर कृषी पत्तीनच्या सदस्या राहिल्या असल्या तरी तालुक्यातील लोकांची आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी त्यांनी म्हादई पतसंस्थेची स्थापना केली आहे.
खानापूर तालुका विकसनशील असला तरी आर्थिक मागास आहे. सर्वसामान्य माणसाच्या गरजा वाढत असल्या आणि पंतप्रधान मोदींच्या अवकृपेने महागाईने कळस गाठला असताना सर्वसामान्य तालुकवासीयांना दिलासा देण्यासाठी ही संस्था स्थापन केली असल्याचे त्यांनी उद्घाटन समारंभात सांगितले. त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
अल्पावधीतच ही संस्था लोकांचा विश्वास संपादन करील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. वर्दे कॉलनीत अवरोळी मठाधिश चन्नबसव स्वामीजींच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन आले. तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष अजिंक्य जाधव यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष बेंनी पिंटो यांनी स्वागत केले. प्रसंगी विजय सानिकोप, राजू कब्बूर, रियाज अहमद पटेल, आर. डी. हंजी, संचालक महादेव कोळी, किरण कोडोळी, अरुण बेळगावकर, सावित्री मादार, भूषण पाटील, अनिता दंडगल आदींसह सभासद उपस्थित होते.
त्या तरुणाने मृत्यूला का कवटाळले?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: अवघा २५ वर्षांचा तरुण गळफास घेऊन मृत्यूला कवटाळतो. त्याने जीवन का संपविले? हरसणवाडी येथील तरुण रोशन रायमन फर्नांडिस याने घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून त्याला फिट्स येत होत्या. त्याच्यावर उपचारही सुरू होते, त्याचा इलाज होत नसल्याने तो निराश झाला होता. त्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या वडिलांनी […]