समांतर क्रांती वृत्त
Mhadai Arbitration extended by one year खानापूर: केंद्र सरकारने म्हादई तंटा लवादाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पाणी वाटप केल्यानंतर लवाद विसर्जीत केला जाणार होता. दरम्यान, गोवा सरकारच्या मागणीवरून जलशक्ती मंत्रालयाने लवादाला २० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याची अधिसूचना जारी केली. १३ नोव्हेंबर २०१० साली लवादाची स्थापना करण्यात आली होती. मुदतवाढ मिळाल्याने गोव्याला दिलासा मिळाला आहे.
डीपीआर रद्द करा
कर्नाटक सरकारने केंद्राकडे दाखल केलेला म्हादई योजनेसंदर्भातील डीपीआर- सविस्तर प्रकल्प आराखडा रद्द करावा, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. म्हादई संदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असतांना केंद्र सरकार कर्नाटकाचा डीपीआर कोणत्या आधारावर स्विकारते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वर्षभरापूर्वीच झाले होते सेवानिवृत्त, ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शेतीत चिखल करतांना ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तिओली येथे घडली आहे. या घटनेत वर्षभरापूर्वीच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग लाटगावकर यांचा मृत्यू झाला असून या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, सध्या तालुक्यात भात लागवडीची धांदल सुरू आहे. […]