
समांतर क्रांती/पणजी
गोव्याने कर्नाटक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह म्हादईसंदर्भातील इतर सर्व याचिकांवर गुरूवारी (ता.२३) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कर्नाटकाचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी केंद्राची भूमिका संशयास्पद असून भाजप म्हादईप्रश्नाचे राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.
म्हादई लवादाच्या निवाड्यानंतरही कर्नाटकाने म्हादई प्रश्नी न्यायालयाची दिशाभूल चालविली होती. त्यामुळे गोवा सरकारने कर्नाटक विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय पाणी वळविण्यास आक्षेप घेणारी याचिकादेखील न्यायप्रविष्ठ आहे. या याचिकांवर २३ रोजी सुनावणी होणार असल्याने दोन्ही राज्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याने जाणिवपूर्वक वेळकाढूपणा चालविला असल्याचा आरोप करीत केंद्राला दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन महिन्यात परवानगी न दिल्यास कर्नाटक सरकार स्वतंत्रपणे यावर निर्णय घेईल, असे म्हटले आहे. त्यामुळे २३ रोजी होणारी सुनावणी महत्वाची ठरणार आहे.

पती म्हणतो ‘ति’ त्याच्यासोबत, पत्नी म्हणते ‘तो’ तिच्यासोबत गेला..
समांतर क्रांती / बेळगाव फरार असलेल्या पतीने त्याची पत्नी परपुरूषासमवेत गेल्याची तक्रार केली. त्यांने त्याची पत्नी परत मिळवून देण्याची मागणी त्यांने पोलिसांकडे केली. हे कमी म्हणून की काय? ‘तिला’ पळविलेल्या इसमाच्या पत्नीने आपला पती ‘तिने’ पळविल्याचा आरोप करीत त्याला परत मिळवून देण्याची मागणी करीत चक्क पोलिस स्थानकासमोरच ठाण मांडले आहे. या प्रकरणामुळे आता चक्रावण्याची वेळ […]